Eknath Shinde, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : शिवेंद्रसिंहराजे भडकले; सातारा- जावलीतील दुष्काळाकडे दुर्लक्ष नको

Shivendraraje Bhosale शिवेंद्रसिंहराजे लवकरच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : प्रशासनाने नुकतेच दुष्काळी तालुके जाहीर केले. सातारा आणि जावली तालुक्यांमध्येही भीषण परिस्थिती आहे. असे असताना सातारा- जावली तालुक्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. हा अन्याय असून प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.

जावली तालुक्यातील Jawali taluka कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale बोलत होते. ते म्हणाले, जावलीच्या शेजारचा वाई तालुका दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यातील कण्हेर, उरमोडी धरणापेक्षा वाईतील धोम धरणात पाणीसाठा जास्त आहे.

जावली तालुक्यातील परिस्थितीही गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सातारा आणि जावली तालुक्यांनाही दुष्काळी तालुक्यांप्रमाणे लाभ देणे आवश्यक आहे. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. Maharashtra Political News

दरम्यान, सातारा आणि जावली तालुक्यांवर अन्याय केल्यास खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने तत्काळ भूमिका घ्यावी. सातारा आणि जावली तालुक्यांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाचे सर्व लाभ या दोन्ही तालुक्यांनाही मिळाले पाहिजेत, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT