Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BJP : फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे

Umesh Bambare-Patil

Shivendraraje Bhosale News : देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा असून लोकांनी तुम्हाला नाकारलं तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले. त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'फडतूस' शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. याबाबत बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी आहे.

उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते असं बोलत असावेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. अशी वक्तव्य थांबवावी अन्यथा, त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ, परंतू अशी आमची परंपरा नाही. त्यामुळे अशी वक्तव्य थांबवावी.

तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यावेळी तुमची कुठेही जायची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारलं. तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले. त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT