Narayan Rane on Sharad Pawar : राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले,''महाविकास आघाडीचं सरकार असताना...''

Maharashtra Politics: शरद पवार यांना अभिप्रेत असा राज्य कारभार लवकरच दिसेल...
Narayan Rane on Sharad Pawar  News
Narayan Rane on Sharad Pawar NewsSarkarnama

Konkan News : छत्रपती संभाजीनगर शहरात रामनवमी उत्सवादरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता आता चिंता वाटायला लागली आहे वक्तव्य केलं आहे. आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Narayan Rane on Sharad Pawar  News
Mahavikas Aghadi: हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची तोफ धडाडणार: भाजपचीही सावरकर गौरव यात्रा

पवार म्हणाले, अलिकडच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात काही प्रकार घडला. इतरही काही ठिकाणी असे प्रकार घडले. आणि या प्रकारांना धार्मिक संदर्भ आहेत की काय? अशी चिंता वाटण्याची परिस्थिती होती असंही पवारही म्हणाले होते.

नारायण राणे(Narayan Rane) हे यांच्या हस्ते कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सिंधदुर्ग भवन येथील आंबा महोत्सव 2023 चं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या टीकेवर भाष्य केलं आहे. राणे म्हणाले,बोलताना संयम असावा. कुणाचीही मन दुखतील असं बोलायला नको असं मला वाटतं.

तसेच शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. कारण त्यांचं सरकार आता सत्तेत राहिलेलं नाही. मात्र, त्यांच्या महाविकास आघाडी सरकारनेच लोकांना जास्त चिंतेत टाकलं होतं. त्या काळात लोकं चिंताग्रस्त होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते अशी टीका करतानाच शरद पवार यांना अभिप्रेत असा राज्य कारभार लवकरच दिसेल असेही राणे यावेळी म्हणाले.

Narayan Rane on Sharad Pawar  News
PM Narendra Modi News: जगात पुन्हा पंतप्रधान मोदींचाच डंका: ग्लोबल लीडर अप्रूवल लिस्टमध्ये अव्वल स्थानावर

मंत्री राणे यांनी यावेळी आजकाल कृषी विद्यापीठं आहेत. मात्र, आंबा कसा पिकवावा, बायप्रॉडक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही असा आरोपही केला. तसेच गेली अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण प्रगत झाल्याची पुष्टीही राणे यांनी यावेळी केली.

एकदाच चांगला मार्ग काढू...

माझ्याकडे या. मी सर्व मदत करतो. एकदाच चांगला मार्ग काढू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटतो. एक पॅकेज जाहीर करायला लावतो. यावेळीउद्योजकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचं आश्वासनही राणे यांनी यावेळी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com