Eknath Shinde, Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara political news : शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; सातारा-जावळी दुष्काळी यादीत

Shivendraraje bhosale शिवेंद्रसिंहराजेंनी दोन्ही तालुक्यांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत

Umesh Bambare-Patil

Satara political News :  दुष्काळी तालुक्यातील आमदारांना जे जमले नाही ते साताराचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करून दाखवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार शिवेंद्रराजे यांनी सातारा व जावळी तालुक्यांचा दुष्काळी यादी समावेश करून घेतला आहे. लवकरच राज्य शासनाकडून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दुष्काळाच्या छायेत असलेल्या सातारा आणि जावली तालुक्याला न्याय मिळावा, यासाठी आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले shivendraraje bhosale यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यांना दुष्काळी म्हणून घोषित करावे आणि शासनाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली.

शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करण्याचा निर्णय घेतला असून, लकवरच राज्य शासनाकडून तशी यादी प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळी तालुके जाहीर केले होते. मात्र, त्यामध्ये सातारा आणि जावली तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या दोन्ही तालुक्यांमध्येही भीषण परिस्थिती आहे. सातारा-जावली तालुक्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. हा अन्याय असून प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला होता.

या दोन्ही तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला असून, पाण्यावाचून पिके करपू लागली आहेत. अत्यल्प पावसामुळे सोयाबीन, ऊस, स्ट्रॉबेरी यासह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. असे असताना या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत न झाल्याने तालुक्यातील जनतेमध्ये नाराजी आणि असंतोषाची भावना होती.

त्यानुसार शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई येथे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करून राज्य शासनाकडून तशी यादी जाहीर केली जाईल, अशी ग्वाही दिली. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे सातारा आणि जावली तालुक्यांना न्याय मिळला असून, दोन्ही तालुक्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Maharashtra political news

शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे सातारा आणि जावली तालुक्यांना न्याय मिळला असून, दोन्ही तालुक्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे भीषण दुष्काळाच्या छायेत असेलेल्या सातारा आणि जावली तालुक्यांतील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT