BJP News : ऐन निवडणुकीच्या प्रचारातच घात झाला,भाजप नेत्याची निर्घृण हत्या; हल्ल्याच्या घटनेने खळबळ

Bjp Leader Murdered In Narayanpur Chhattisgarh : पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार धडाक्यात सुरू झाला आहे. आणि अशातच प्रचारादरम्यान भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे...
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज छत्तीसगडच्या दुर्गमध्ये प्रचार सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची एकीकडे सभा झाली असताना दुसरीकडे भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. आणि या मतदानाच्या फक्त तीन दिवस आधी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

BJP
Caste Based Census : जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, पण... ; अमित शाहांचं मोठं विधान

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच भाजप नेते रतन दुबे यांची हत्या करण्यात आली आहे. रतन दुबे हे भाजप जिल्हा उपाध्यक्ष होते. कौशलनारमध्ये भर बाजारात त्यांची हत्या करण्यात आली. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण नक्षलवाद्यांनी रतन दुबे यांची हत्या केल्याचा संशय आहे.

छत्तीसगडच्या बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रतन दुबे यांची हत्या झाल्याची माहिती पी. सुंदरराज यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांनी दुबे यांची हत्या केली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नकार दिला नाही. घटनास्थळी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे. तसंच हत्येत नक्षलवाद्यांचा हात आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल, असं पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी रतन दुबे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आणि हत्येचा तपास सुरू केला आहे. छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूरमध्ये घरात घुसून भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात भाजप नेते बिरजू तारम यांची हत्या करण्यात आली होती. मानपूर पोलिस ठाण्यातील सरखेडा गावात त्यांची हत्या झाली होती. गेल्या महिन्यात २० ऑक्टोबरला हत्येची ही घटना घडली होती.

BJP
BJP Manifesto : 500 रुपयांत गॅस सिलिंडर, विवाहित महिलांना 12 हजार रुपये; छत्तीसगडच्या जाहीरनाम्यात भाजपनं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com