Shivraj More Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कराडचे शिवराज मोरेंची युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

दुसऱ्या क्रमांकावर कऱ्हाडचे Karad शिवराज मोरे Shivraj More आहेत. त्यांना तीन लाख 80 हजार 367 मते मिळाली आहेत. काँग्रेस Congress नेते बसवराज पाटील Basavraj Patil यांचे पूत्र शरण पाटील Sharan Patil यांना दोन लाख 46 हजार 695 मते मिळाली होती.

- सचिन शिंदे

कऱ्हाड : महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासह अन्य महत्वाच्या पदासाठी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल युवक काँग्रेसच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. प्रदेशाध्यक्ष पदासाठी 14 उमेदवारांपैकी सर्वाधिक मते मिळवून कुणाल राऊत, कऱ्हाडचे शिवराज मोरे आणि शरण पाटील प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत होते. दिल्ली येथे मुलाखत झाल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी कुणाल राऊत तर कऱ्हाडचे शिवराज मोरे आणि शरण पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासह अन्य महत्वाच्या पदावरील नियुक्त्यांसाठी नोव्हेंबर व डिसेंबर 2021 मध्ये राज्यभर सदस्य अभियान राबविले. सदस्य नोंदणी झाल्यावर प्रत्येक मतदाराने ऑनलाइन प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहराध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष अशा चार पदांसाठी मतदान केले होते. त्या मतदानाचा निकाल जाहीर झाला आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल राऊत यांना सर्वाधिक पाच लाख 48 हजार 267 मते मिळाली.

दुसऱ्या क्रमांकावर कऱ्हाडचे शिवराज मोरे आहेत. त्यांना तीन लाख 80 हजार 367 मते मिळाली आहेत. काँग्रेस नेते बसवराज पाटील यांचे पूत्र शरण पाटील यांना दोन लाख 46 हजार 695 मते मिळाली होती. सर्वाधिक मते घेणाऱ्या या तिघांपैकी एकाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी घोषणा होणार होती.

त्यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. बी. श्रीनिवास, सचिव कृष्णा अलवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन सचिव यांनी तिघांची मुलाखत घेतली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत, उपाध्यक्षपदी शिवराज मोरे, शरण पाटील यांची निवड आज जाहीर झाली. शिवराज मोरे गेली तीन वर्षे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यापूर्वी एनएसयुआय निवडणुकीत प्रदेशाध्यक्षपदी निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT