Solapur News: एकनाथ शिंदेंच्या 2022 मधील सर्वात मोठ्या बंडानं शिवसेनेसह महाराष्ट्राचं राजकारणही हादरलं होतं. या बंडावेळी शिंदेंची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत साथ देणार्या नेत्यांमध्ये सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचाही समावेश होता. त्यांच्या ग्रामीण भाषेतील काय झाडी काय डोंगर या डायलॉगनं त्यांना एका रात्रीत महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. यानंतर शहाजीबापूंनी अनेक सभा गाजवल्या. पण आता त्यांची तोफ थेट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत धडाडणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं 40 स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली आहे. यात सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांच्या नावाचाही समावेश होणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शहाजीबापू पाटील यांनी 2024 ची सांगोल्याची निवडणूक गमावली असली, तरी त्यांनी नु्कत्याच राज्यात पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारत शिवसेनेचा भगवा फडकवला होता. या विजयानंतर शिंदेंनी त्यांचा मुंबईत बोलवून जाहीर सत्कार केला होता.
शहाजीबापू पाटील हे येत्या 5 जानेवारीपासून महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शहाजीबापूंना प्रचारासाठी मुंबईत बोलावणं आलं आहे. ते शिंदेंच्या आदेशानुसार मुंबईसह सर्वत्र धडाकेबाज प्रचारार्थ सभा घेणार आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले, मुंबई महायुतीचा प्रचार आपण करणारा असल्याचे सांगताना संजय राऊत सारख्याला तर कस्पटासारखा उडवून लावणार असल्याचंही बापूंनी ठणकावून सांगितलं.
माजी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले,मुंबईत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी सामना होणार असला तरी आम्ही राजकीय विरोधक असून प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देणार आहे. ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन खूप मोठी चूक केली. त्यांचं वलय आणि अस्तित्व हळूहळू संपत जाईल. ते स्वतंत्र लढले असते, मात्र आता राज ठाकरे निस्तेज होत जातील आणि उद्धव ठाकरे याचा फायदा घेतील असा टोलाही शहाजी बापूंनी लगावला.
शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात भाजप,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षांनी एकत्र आले होते. त्यामुळे शहाजीबापूंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात त्यांनी आपला करिष्मा दाखवत सांगोल्यात 20 पैकी 17 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता आणली. सांगोला नगरपरिषदपदाच्या उमेदवार आनंदा माने या विजयी झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.