AIMIM News: 'एमआयएम'चं खतरनाक प्लॅनिंग,ओवैसी बंधू महाराष्ट्रात तळ ठोकणार! भाजपची झोप उडणार, 'या' सात महापालिका टार्गेट ?
Mumbai News: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी घमासान सुरू असतानाच बंडखोरी आणि नाराजीनं सत्ताधारी महायुतीपासून ते विरोधकांसाठी डोकेदुखी वाढली आहे.अशातच विधानसभेच्या निराशाजनक कामगिरीनंतर नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारत मोठं यश मिळवलं आहे. आता त्याच यशाची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत करण्यासाठी एमआयएमनं जोरदार तयारी केली आहे. एमआयएम (AIMIM) नेमका महायुती की महाविकास आघाडीचा 'कटी पतंग' करणार याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार आहे.महायुतीतील भाजप,एकनाथ शिंदेंची शिवसेना,अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्षातील उद्धव ठाकरेंची शिवसेना,मनसे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. पण बंडखोरांनी वाढवलेल्या टेन्शननंतर आता वंचित बहुजन आघाडीनंतर आता ओवैसींच्या 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) पक्षानंही राजकीय हालचाली वाढवल्या असून आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी मोठं प्लॅनिंग केलं आहे.
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज भरून झाले,बंडखोरीही करून झाली,काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्याचेही प्रयत्न झाले,मनधरणी झाली. अनेकांनी माघार घेतली तर काहींचे अर्ज अवैध ठरल्याने ते बाद झाले. अखेर आता महापालिका निवडणुकीसाठी अंतिम चित्र आता स्पष्ट झालं आहे.
यातच एमआयएमच्या औवैसी बंधूंनी महापालिका निवडणुकीत (Municipal Election) दंड थोपटले असून ते महापालिका निवडणुकीच्या अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं समोर येत आहे. ओवैसी बंधू छत्रपती संभाजीनगर,सोलापूर,मालेगाव,धुळे,जालना,परभणी,मुंबई यांसह राज्यातील प्रमुख महापालिकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी एमआयएमनं मोठं प्लॅनिगं केल्याची माहिती समोर येत आहे. एमआयएमचा प्लॅन जर यशस्वी ठरला, मुस्लिम मतदारांची साथ मिळाली,तर भाजपसह महायुती आणि विरोधकांचं सत्तेच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो.
एमआयएम अर्थात 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) पक्षानं महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा,मेळावे,भेटीगाठी,रोड शो,बैठका यांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.यामुळे एमआयएम त्यांची ताकद असलेल्या महापालिकांमध्ये जोर लावणार असल्याचं दिसून येत आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी, अकबरुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहे.
गेल्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनंतर एमआयएम हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. यंदाच्या निवडणुकीत एमआयएमनं एकूण 50 उमेदवार उभे केले आहे.त्यात एमआयएमने 25 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे एमआयएम हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसला होता आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं होतं. त्यामुळे आताही सगळ्यांचं लक्ष एमआयएमकडे लागलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये 115 नगरसेवक पदासाठी 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यात सर्वाधिक उमेदवार हे उबाठाचे आहेत.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या निवडणुकीत तब्बल 97 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. त्या पाठोपाठ भाजपने 94 उमेदवार उभे केले आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 92 उमेदवारांना संधी दिली आहे.काँग्रेसने 77 तर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस 77 जागेवर उभी आहे.
वंचित बहुजन आघाडीचे 62, एमआयएमचे 48, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 25, बसपाचे 21, रिपाई आठवले गटाचे 6 आणि अपक्ष 260 असे 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीतही एमआयएम किंगमेकर ठरण्याची शक्यता असून भाजप आणि विरोधी पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात नुकत्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत 'एमआयएम'ने 84 जागांवर आपला विजय मिळवला.तसेच यातील 1 नगराध्यक्ष हा एमआयएमचा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. एमआयएमनं मुंबई महापालिकेत आपला निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे.त्यांनी आपल्या पक्षासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून मुंबईतही एमआयएमनंही आपली पूर्ण ताकद लावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

