Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारलं मिंधे कोण?

Shivsena : मित्रपक्ष असलेल्या भाजपशी गद्दारी केली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.

उमेश भांबरे :सरकारनामा

Political News : लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही. त्याला वाघाचं काळीज लागतं. आमच्या दृष्टीने वाघ एकच होते ते फक्त बाळासाहेब ठाकरे. वेळ आली तर माझं दुकान बंद करीन पण काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, असं म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी त्यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले मग खरे मिंधे कोण, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब (Balasaheb thackeray) यांचेच विचार घेऊन आम्ही आणि आमच सरकार पुढे चाललोय. ज्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपशी गद्दारी केली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांनी कोरोना काळात कफन चोरी केली, खिचडी घोटाळा केला त्यांनी आमच्यावर बोलू नये. जनता सब जानती है... येणाऱ्या निवडणुकीत यांना मिंधे कोण याचे उत्तर जनताच देईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळदरे या गावी बुधवारी आले होते.

बाळासाहेबांनी काँग्रेसला कायम दूर ठेवलं होतं जर तशी वेळ आली तर माझं दुकान बंद करीन, असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांना यानी तिलांजली दिली. यांनी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले मग मिंधे कोण,असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी केला. बाळासाहेबांसारखे कपडे घालून आणि रुद्राक्षाच्या माळा घालून कोणी बाळासाहेब होऊ शकतनाही. त्यासाठी बाळासाहेबांचे विचार पाळावे लागतात. त्यांच्या विचारावर चालावं लागतं. बाळासाहेबांचे खरे विचार आम्हीच पाळत आहोत, असे शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींनी स्वप्न पूर्ण केले

बाळासाहेबांचे स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केला आहे .खरंतर यांनी मोदींना साष्टांग दंडवत घालायला हवा होता, मात्र हे मोदींवर टीका करत असून काँग्रेसला दंडवत घालत आहेत. मात्र 'जनता सब जानती है' या निवडणुकीत राज्यातील जनता यांनाच खरा मिंदेपणा कोणी केला याचे उत्तर देईल, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे खिचडी चोर कोरोना काळात यांनी कफन चोरी केली त्यांनी आमच्यावर बोलू नये त्यांची नीतिमत्ता साफ नाही, अशी सडकून टीका केली.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT