Eknath Shinde: '...तर मग एकनाथ शिंदे तीस वर्षे मुख्यमंत्री'!

Abdul Sattar News : अमित शाहांच्या वक्तव्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांचे उत्तर
Amit Shah, Abdul Sattar, Eknath Shinde
Amit Shah, Abdul Sattar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीतील पक्षामध्येच मुख्यमंत्री पदासाठीची रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपमधील कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आगामी काळामध्ये मुख्यमंत्री होतील असे सांगत आहेत, तर दुसरीकडे अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असणार आहेत, असा दावादेखील राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहेत. त्यात आता शिवसेना शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेच पुढील 30 वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य केले आहे.

भाजपच्या देशभरातील प्रमुख नेत्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी किमान ३२ जागा लढण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. त्यादृष्टीने सुरू असलेल्या तयारीची माहिती नड्डा आणि अमित शाह यांनी घेतली.

Amit Shah, Abdul Sattar, Eknath Shinde
Kedar Dighe News: केदार दिघेंना आमदारकीचे वेध ? 'भावी आमदार' लिहिलेला केक कापल्याने चर्चा

त्यावेळी अमित शाह (amit shah) यांनी पुढील ३० वर्षे भाजप सत्तेत राहील, असे काम पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावे,’ असे आवाहन शाह यांनी पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करताना केले. पक्षाच्या या बैठकीत महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन या मंत्र्यांसह अन्य नेत्यांनी सहभाग घेतला होता.

आता याबाबत यावर आता शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटातील मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी पुणे दौऱ्यादरम्यान वक्तव्य केले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, अमित शाह यांचे बोलणे योग्य असून, देशात लोकशाही आहे.

जोपर्यंत लोक एखाद्या नेत्याच्या पाठीशी आहेत आणि ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतात आणि तो पक्ष सत्तेत राहतो. त्यामुळे भाजप पुढील 30 वर्षे सतत राहणार आणि त्यांच्या सोबत आम्ही सत्तेत असणार आहे. त्यामुळे आमचा फायदा होणार असून, पुढील 30 वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा सत्तार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवरती बोलताना सत्तार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. उद्धव ठाकरे संभ्रम निर्माण करत आहेत, आता हे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत, पण कोर्ट आम्हाला न्याय देईल.

महायुती का तोडली याचे उत्तर ठाकरे यांनी देणे आवश्यक आहे. आता पक्षप्रमुख म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत आम्ही मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Sachin Waghmare)

Amit Shah, Abdul Sattar, Eknath Shinde
Abdul Sattar: अब्दुल सत्तार शिंदे सेनेशी असलेला प्रासंगिक करार मोडणार ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com