Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: आमदार क्षीरसागरांकडून 'अदृश्य शक्ती'ची पाठराखण, मुश्रीफ- महाडिक वादानंतरही 'गोकुळ'च्या निवडणुकीबाबत मोठे संकेत

Kolhapur Gokul election: मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी गोकुळ संदर्भात बैठक घेतली होती. महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. निवडणूक टप्प्यात आली आहे. त्यामुळे महायुतीची बैठक होईल आणि महायुती म्हणूनच लढू.

Rahul Gadkar

Kolhapur News: राज्यातील सत्तेचा लाभ अनेक जण घेत आहेत. ज्याच्या अधिक जागा त्याला अधिक महत्त्व दिलं आहे. त्यामुळे गोकुळमध्ये देखील काही तडजोडी केल्या पाहिजेत. राज्यात मोठा भाऊ भाजप, मधला भाऊ शिवसेना आणि छोटा भाऊ राष्ट्रवादी आहे. पण कोल्हापुरात त्याचा सर्वाधिक सत्तेचा लाभ राष्ट्रवादीला होत आहे. त्यामुळे काही तडजोडी होऊ शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस व जन सुराज्य शक्तीच्या संस्था अडचणीत आणाव्यात असा विषय नव्हता. पक्ष म्हणून त्या संस्थांवर तक्रारी नव्हत्या. त्या संस्थांच्या काही त्रुटी आहेत म्हणून त्या संदर्भात हरकती होत्या. पक्षाला अडचणीत आणायचं म्हणून असं काही केलं मला वाटत नाही, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देत गोकुळमधील अदृश्य शक्तीची पाठराखण केली. ते कोल्हापुरात बोलत होते.

पदवीधर निवडणुकीवरून बोलताना, मंगेश चिवटे यांची आरोग्यदूत म्हणून राज्यभरात ओळख आहे. प्रत्येक तालुक्यात आरोग्य विषयक मोठी मदत केली आहे. राज्यातील जनतेचा, शिक्षकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार घेतील. मंगेश चिवटे हा पुणे शिक्षण मतदारसंघातील उजवा उमेदवार आहे. त्यांच्या उमेदवारी बाबत विचार होईल याची मला खात्री, असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी गोकुळ संदर्भात बैठक घेतली होती. महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. निवडणूक टप्प्यात आली आहे. त्यामुळे महायुतीची बैठक होईल आणि महायुती म्हणूनच लढू.

थोडेफार मतभेद होऊन इकडे तिकडे असतील पण महायुतीच्या सर्व जागा निवडून येणार. सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी ही महायुतीच्या सर्व नेत्यांची आहे. कुणाकडे किती ठराव आहेत याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उमेदवाराला कोणता धोका होणार नाही. महायुतीच्या नेत्यांची जबाबदारी आहे सर्वांना निवडून आणण्याची अशा शब्दात स्पष्टीकरण दिले.

सतेज पाटील यांच्याकडे ठराव कमी असल्याने निवडणुकीत त्यांना कोणता तरी मुद्दा पाहिजे असतो. निवडणुकीत उतरायचं म्हटल्यावर ते ब्रँडला धक्का लागेल असे बोलत आहेत. मात्र गोकुळ हा असा ब्रँड आहे तो सर्वांच्या पुढे गेलेला आहे, असेही म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दुष्काळ मागणीवर बोलताना, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओला दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर करावा ही मागणी सातत्याने होतच आली आहे. याशिवाय ह्यांना काहीही सुचत नाही. जो अतिरिक्त पाऊस पडतो तो दुष्काळी भागात वळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. 80 टीएमसी पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवणार आहोत, असेही क्षीरसागर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT