Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : आमचा उठाव पाहून 'या' देशातील खासदारांनीही बंड केलं अन् पंतप्रधानाला हटवलं; शहाजीबापूंची फटकेबाजी

Shahajibapu Patil In Sangli : "पांडुरंग त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही", शहाजीबापू पाटील यांनी कुणाला दिला शाप?

Akshay Sabale

Maharashtra Politics: आम्ही शिवसेनेत उठाव केला. तो पाहून इंग्लंडमधील खासदारांनीही उठाव केला आणि पंतप्रधानाला काढून टाकलं. तर, आम्ही काय वाईट केलं. दिल्लीत दाढी, महाराष्ट्रात दाढी आणि आमचीही दाढी आहे. मी अजिबात हटणार नाही. कितीबी आडवे या, असं म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. विट्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील बोलत होते.

शहाजीबापू पाटील ( Shahajibapu Patil ) म्हणाले, "जगाला हादरवून टाकणारा उठाव आम्ही केला होता. आमच्या उठावानंतर इंग्लंडमधील खासदारांनी सुद्धा, असा उठाव केला आणि पंतप्रधानाला हटवलं. तर, आम्ही काय वाईट केलं आहे? सातत्यानं 50 खोकेवरून आमच्यावर आरोप केला जातो. पण, एकदा आकडा बारका तरी करा किंवा मोठा तरी. कितीदिवस एकाच आकड्यावर बसणार आहात."

"ज्यांनी-ज्यांनी 50 खोक्यांवरून आरोप केला, त्यांना भगवंत पांडुरंग त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शाप आहे. दिल्लीत दाढी आहे. महाराष्ट्रातही दाढी आहे. आणि आमचीही दाढी आहे. अजिबात मागे हटणार आहे, कितीही आडवे या. आता फक्त निवडणुकीत मते मोजा," असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.

"उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना 50 खोके भेटले. आम्हीपण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला 50 खोके भेटले नाहीत," असं आव्हान शहाजीबापू पाटील यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT