Shahaji Patil: पाटील आला...! मुख्यमंत्री शिंदेंच्या सेलिब्रिटी आमदाराचा थाटच न्यारा!

Shahaji Patil Sangola Celebrity Style Procession in a Buggy: यलमार समाज मोठ्या संख्येने आहे.समाजासाठी एक भवन असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. ही मागणी शहाजीबापूंनी पूर्ण केली.
Shahaji Patil
Shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

सेलिब्रिटी आमदार अशी ओळख असलेले 'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil)पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शहाजीबापूंची बग्गीतून मिरवणूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शहाजीबापूंनी यलमार भवन बांधण्यासाठी एक कोटी निधी दिल्याने यलगार समाजाने त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले, त्यांच्यावर जेसिबिने फुले उधळण्यात आली.

यलमार समाजाच्या वतीने सांगोला (Sangola) ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत शहाजीबापूंची सजवलेल्या बग्गीत बसवून मिरवणूक काढण्यात आली.'पाटील आला' हे गाणे वाजवण्यात येत होते. एकाद्या निवडणुकीच्या विजयानंतर जशी मिरवणूक काढली जाते, तशीत मिरवणूक शहाजीबांपूची यलगार समाजाने काढली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच विजयी उमेदवारांसारखी शहाजीबापुंची मिरवणुकीनं सगळ्याचे लक्ष वेधून घेतले.

सांगोला तालुक्यात यलमार समाज मोठ्या संख्येने आहे.समाजासाठी एक भवन असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती . यलगार समाजाची ही मागणी शहाजीबापूंनी पूर्ण केली. त्यांनी समाज भवनासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला. "राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार," असा विश्वास त्यांनी यलमार मंगेवाडीत सत्कारावेळी व्यक्त केला.

Shahaji Patil
Laxman Hake: मी बॉण्ड पेपरवर लिहून देतो...मनोज जरांगे यांच्याबाबत लक्ष्मण हाके असे का म्हणाले...

राजकारणातील गणिते सध्या बदलली आहे. येणाऱ्या पाच वर्षात सांगोला तालुक्यात विकासाचे पर्व आणणार, असा शब्द शहाजीबापूंनी यावेळी दिला. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गुडघ्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर बापू आता पुन्हा सक्रीय झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com