MLA Sanjay Gaikwad controversy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : ''पानसरेंचं काय झालं माहितीये ना?"; असे म्हणत धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल

Sanjay Gaikwad vs Prashant Ambi Over Shivaji Kon Hota Book : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Aslam Shanedivan

  1. आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप होत असून यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

  2. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  3. या प्रकरणामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण तापले आहे.

Sanjay Gaikwad Controversy : मुंबईत आमदार निवासातील कँटीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड पु्न्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्कतावरून त्यांनी संताप व्यक्त केला. पण हा संताप व्यक्त करताना या यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता कोल्हापुरात या प्रकरणी प्रकाशक आंबी यांनी तक्रार अर्ज दाखल केली आहे.

आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन अश्लील शिवीगाळ केली होती. या फोन कॉलचा कथित ऑडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. ज्यात आमदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? असे म्हणत गोविंद पानसरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असाही इशारा दिला होता. यानंतर आता कोल्हापुरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून आमदार गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. तसेच आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

आता शहरातील राजारामपूरी पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात प्रकाशक प्रशांत आंबी यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर पोलिसांनी याबाबत माहिती देताना योग्य तो तपास करून पुठील कारवाई करू असे म्हटले आहे. दरम्यान आमदार गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलनकांनी गायकवाड यांच्या पुतळ्याला जोडे मारले तसेच जोरदार निदर्शने केली आहे.

रोहिणी खडसेंकडून समाचार

“दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल ३७ वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गायकवाड यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो ? वाचन आणि त्यांचा काही दूर दूरपर्यंत काही संबंध असेल याची शक्यता कमीच आहे. पण समाजात वितुष्ट निर्माण करण्यात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांनी पीएचडी घेतल्याची टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.

वकील सरोदेंचे थेट गायकवाडांना आव्हान

तर वकील असीम सरोदे यांनी थेट गायकवाडांना आव्हान देत ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकांचे जाहीर वाचन आपण बुलढाण्यात लवकरच करणार असल्याचे जाहीर केले. तसेच गायकवाड काय करतात हे बघू असेही आव्हान दिले आहे.

FAQs :

1. तक्रार कोठे दाखल करण्यात आली आहे?
कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

2. वादाचा मुख्य मुद्दा काय आहे?
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून आमदारांनी प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप आहे.

3. प्रकाशक कोण आहेत?
प्रशांत आंबी हे संबंधित पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

4. गायकवाडांवर काय आरोप आहेत?
शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

5. या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहेत?
राजकीय आणि सामाजिक स्तरावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT