Sanjay Gaikwad news : बुलढाण्यात जाहीर वाचन, संजय गायकवाड काय करतो बघूया! ठाकरेंच्या वकिलाचं खुलं आव्हान...

'Shivaji Kon Hota' book controversy : संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde, Sanjay Gaikwad
Eknath Shinde, Sanjay Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी फोनवरून घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याची त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. गायकवाड यांनी मीडियासमोर तशी कबुलीही दिली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होऊ लागली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील असीम सरोदे यांनी संजय गायकवाड यांना खुलं आव्हान दिले आहे. सरोदे यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करत म्हले आहे आहे की, बुलढाण्यात लवकरच 'शिवाजी कोण होता' या पुस्तकांचे जाहीर वाचन. संजय गायकवाड काय करतो बघूया.

ऑडिओ संवाद ऐका. आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शिर्षकात 'शिवाजी कोण होता' असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाडचा आक्षेप आहे. व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला कि, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला, असे सरोदे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Eknath Shinde, Sanjay Gaikwad
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचे थेट मंत्रालयात पडसाद; पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्याला दणका

सॅल्यूट केला पाहिजे प्रशांत आंबी या प्रकाशकाला. त्यांनी भाषेचा स्तर, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला. आत्ताच माझे प्रशांत सोबत बोलणे झाले. संजय गायकवाड विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार, असल्याचेही सरोदे यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde, Sanjay Gaikwad
MLC election : विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सपकाळ म्हणाले, ते महाविकास आघाडीचा चेहरा...

संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई प्रमाणे हृदयातील स्थान देऊन 'शिवाजी' म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. बरं संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत सुध्दा नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अशा मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल, असे सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com