Kishor Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News : मागच्या वेळी केवळ 'मन की बात' होती...असे का म्हणाले किशोर पाटील

Political News : प्रथमच शिवसेनेच्या अधिवेशनात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. आमचे नेते  स्वतः अधिवेशनात बसून आहेत, ते पदाधिकऱ्यांचे विचार ऐकून घेत आहेत.

उमेश भांबरे :सरकारनामा

Kolhapur Shivsena Adhiveshan : शिवसेनेच्या या अधिवेशनातून आम्ही सर्व पदाधिकारी हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणार आहोत. प्रथमच शिवसेनेच्या अधिवेशनात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. आमचे नेते  स्वतः अधिवेशनात बसून आहेत, ते पदाधिकऱ्यांचे विचार ऐकून घेत आहेत. मागील काळातील अधिवेशनात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना 'मन की बात' ऐकायला लागत होती, अशी खोचक टीका जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

दरम्यान, शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानावर सुरू आहे. या वेळी आमदार  पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. या वेळी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील म्हणाले, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शिवसेनेच्या अधिवेशनाची सुरुवात कोल्हापूर येथून केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शुक्रवारी अधिवेशनास सुरुवात केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजेरी लावली आहे.

या आधिवेशनातून ऊर्जा घेऊन जाणार, तसेच आगामी काळात पुन्हा महाराष्ट्राची सत्ता घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना धन्यवाद देतो. सध्या राज्यात युतीचे सरकार असून, मुख्यमंत्री शिंदे हे केवळ चार तासांपेक्षा जास्त झोप घेत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याच्या हिताचे निर्णय घेताना सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री चांगले काम करत असून, अधिवेशनातून हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही जनतेत जाणार आहोत. अधिवेशनात सगळ्या नेत्यांना वेगवेगळे विषय दिले आहेत. त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करत आहेत.

अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या हस्ते झाले असून, उद्या समारोपही मुख्यमंत्री करतील. यावेळेस प्रथमच शिवसेनेच्या अधिवेशनात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. आमचे नेते स्वतः अधिवेशनात  बसून आहेत, ते पदाधिकऱ्यांचे विचार ऐकून घेत आहेत. मागील काळातील अधिवेशनात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना 'मन की बात' ऐकायला लागत होती, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

(Edited by : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT