Kishor Patil News : पत्रकाराला शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार पाटील म्हणतात... ही बाळासाहेबांची स्टाईल

Kishor Patil Audio Clip Viral News : शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली.
Kishor Patil News
Kishor Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : पाचोरा येथील शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांनी एका पत्रकारास भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी जोरदार वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळचे समर्थन केले असून, जो ज्या भाषेत बोलणार त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची आम्हाला बाळासाहेंबांची शिकवण असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवीगाव करून पाटलांनी त्याला बाळासाहेबांच्या स्टाईलचा संदर्भ जोडल्याने वाद वाढू शकतो.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तीचा खून केल्याप्रकरणी भडगाव तहसील कचेरीवर मोर्चा निघाला होता. यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भ्रमणध्वीवरून संपर्क करून पिडीतेच्या पालकांशी संवाद साधून त्यांचे सात्वंन केले होत. पाचोरा येथील आमदार पाटील यांनी हा संवाद घडवून आणला होता.

Kishor Patil News
Jitendra Awhad Birthday : जितेंद्र आव्हाडांना शुभेच्छा, तर अजितदादांना टोले; ठाण्यात बॅनरबाजी

यानंतर या प्रकरणी तेथील पत्रकार संदीप महाजन यांनी आमदार पाटील यांना फोन केला होता. त्यात त्यांच्यात वाद झाला आणि आमदार पाटील यांनी शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली. शिवीगाळ केल्याच्या व्हायरल क्लिपप्रकरणी आमदार पाटील यांनी समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले कि या संवेदनशिल प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकांशी संवाद करून त्यांचे सात्वंन केले, त्याला हा पत्रकार 'चमकोगिरी'म्हणत असेल तर हे कसे सहन केले जाईल.

Kishor Patil News
Kirit Somaiya News : सोमय्यांचा पहिला ‘व्हिडिओ’ व्हायरल; ठाकरेंचे तिघेजण जेलमध्ये जाणार ?

हा पत्रकार संवेदनशिल प्रकरणात महामोर्चा निघाला असतांना त्या ठिकाणी उपदेशाचे डोस पाजत होता. तो चुकीचे सल्लेही देत होता. तो जर असे सल्ले देत असेल तर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी दिलेला शब्द मागे घेत नाही. ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत शिव्या दिलेल्या आहेत. आदरणीय बाळासाहेबांची हीच शिकवण, असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com