Naresh Mhaske, Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Politics : राऊत गरजल्यावर म्हस्केही बरसले; याला चाटुगिरी म्हणायचं काय? म्हस्केंचा सवाल

Sanjay Raut Vs Naresh Mhaske : शिवसेनेच्या कोल्हापूरमधील महाअधिवेशनावरून संजय राऊतांच्या टीकेवर पलटवार

सरकारनामा ब्यूरो

उमेश बांबरे

Kolhapur Political News :

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी शिवसेनेचे कोल्हापूरमधील अधिवेशनावरून जहरी टीका केली होती. त्याला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही तेवढ्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी हातमिळवणी केली. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या दारात राऊत वाट बघत उभे राहत होते, याला चाटुगिरी की लुक्केगिरी म्हणावे, अशी खरमरीत टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. (Shivsena Kolhapur Adhiveshan)

नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या अधिवेशनावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिले. नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊत हे पूर्वीच्या शिवसेनेत होते. आता तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यांच्या डोक्यात थोडा जरी मेंदू शिल्लक असेल तर त्याला त्यांनी चालना द्यावी. शिवसेना ही काँग्रेसच्या (Congress) विरोधातील संघटना आहे. आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत युती केली आहे.

संजय राऊतांनी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत महाआघाडी केली. त्यावेळी शरद पवार तसेच सोनिया गांधी यांच्या दारात उभे राहत होते. ही चाटुगिरी की लुक्केगिरी म्हणायची, असा सवाल त्यांनी केला. ज्याप्रमाणे कुत्रे दारात उभे राहते भाकरी टाकली की ते उठून बाहेर जाते त्याप्रमाणे राऊतांचे आहे, अशी कठोर टीका त्यांनी राऊतांवर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचवेळी आता याला संजय राऊतांची चाटुगिरी की लुक्केगिरी म्हणावी, असा प्रश्न नरेश म्हस्के केला. शिवाय त्यांनी पातळी सोडली असेल तर आम्हीही त्यांना त्याच ताकदीने उत्तर देणार आहे. उद्धव ठाकरे यांचा आम्ही आदर करतो, पण राऊत यांनी त्यांची दशा केली आहे, असा आरोप म्हस्के यांनी केला.

अधिवेशनावरील टीकेला उत्तर देताना म्हस्के म्हणाले, कोणाला तरी शिवसेनाप्रमुख करण्यासाठी त्यांनी महाबळेश्वरला अधिवेशन घेतले होते, त्यांनी पक्षप्रमुख पक्षावर लादला आहे, अशी टीका केली.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT