Shivsena MLA Viral Video Controversy; Satej Patil and Rajesh Kshirsagar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Viral Video Controversy : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्यामागे बंटी पाटलांचा हात, वडिलांच्या स्टिंग ऑपरेशनवर मुलाचं स्पष्टीकरण

Ruturaj Kshirsagar Targets congress lmc Satej Patil Over Rajesh Kshirsagar Viral Video : शिवसेनेचे नेते आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापपरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Rahul Gadkar

Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर कोल्हापुरात खळबळ माजली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत व्हिडिओ बॉम्ब टाकला.

यावर आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट करत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओ व्हिडीओ प्रसारित करण्यात बंटी पाटील यांचाच हात असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकारद्वारे केला आहे.

ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसारित कलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, उपद्रवी रवि इंगवले हा स्वत:ला खूप शहाणा समजतो. पण, तो आहे तर ब्लॅकमेलर... माझा कॅसिनो मधील व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी पैशाची मागणी करण्यासाठी एका व्यक्तीला रवि इंगवले याने आमच्याकडे पाठविले होते. पण आम्ही त्याला भीक घातली नाही. अशा पद्धतीने कोल्हापूरातील अनेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे, गंडा घालण्याचे काम रवि इंगवले याने केले आहे व करत आहे.

आज सोशल मिडीयावर प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिप सोबत जी ऑडीओ क्लिप प्रसिद्ध केली असून, यामध्ये वापरण्यात आलेल्या अपशब्दांद्वारे आमची नाहक बदनामी केली आहे. त्याचेवर आम्ही कायदेज्ज्ञांचा सल्ला घेत असून, हा एडीट केलेला व्हिडीओ त्यांनी प्रसारित केला आहे. यातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याविरुद्ध रु.५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत आहोत.

वास्तविक पाहता हा व्हिडीओ प्रसारित करण्यात मुळात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचाच हात आहे. व्हिडीओ हा विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करून याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचा यामध्ये कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाले.

वास्तविक ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ बनविला होता त्या व्यक्तीने त्याचे लेखी म्हणणे व स्वत:चा व्हिडीओ तयार करून आमदार राजेश क्षीरसागर यांचा यामध्ये कसलाही संबध नसल्याचे जाहीर केले असून, लवकरच यासंदर्भात आम्ही हे सर्वपुरावे घेवून मिडीयाच्या माध्यमातून जनतेसाठी प्रसारित करत आहोत. रवि इंगवले हा लायकी शून्य असलेला गुंड असून, मी काही बोलण्यापेक्षा कोल्हापूर शहरातील जनता सुज्ञ असून जनतेने त्याला त्याची लायकी दाखवून दिली आहे.

रवि इंगवले कितीही भूकला तरीही कोल्हापूर शहरातील जनतेसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचे विकासात्मक, आंदोलनात्मक, सामाजिक, आरोग्य विषयक, क्रीडा, कला क्षेत्रातील जे योगदान आहे त्यामुळे जनतेचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर असलेला विश्वास कधीही कमी होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. आजपर्यंत आम्ही जनतेत शून्य किंमत असलेल्या रवि इंगवलेला कोणतीही भीक घातली नसून, पुढच्या काळात कुठलीही भीक न घालता याचा खरा चेहरा जनतेसमोर आणू. आमदार राजेश क्षीरसागर हे विधिमंडळ अधिवेशन कामी मुंबईमध्ये असून या प्रकरणासंदर्भात रविवारी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT