Sushma Andhare, Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'आधी संघाला सल्ला द्या, मग आम्ही देखील तुमचा सल्ला ऐकू', दसरा मेळाव्यावरून टीका करणाऱ्या चंद्रकांतदादांना ठाकरेंच्या वाघिणीनं थेट फटकारलं

Sushma Andhare slams BJP Leader Chandrakant Patil : भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता. आता त्या सल्ल्यावरूनच ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी कडक शब्दात चंद्रकांतदादांचा समाचार घेतला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : सध्याची राज्यातील पूर परिस्थिती पाहता सांगलीमध्ये होणारी 1 ऑक्टोबरची इशारा सभा आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेता येईल का? याबाबत विचार करत आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा देखील ऑनलाईन घेता येता का याचा विचार करावा असा सल्ला भाजप नेते तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावला आहे. त्यांनी, यावरून भाजपसह संघाकडे बोट दाखवले असून आधी संघाला सल्ला द्या, मग आम्ही देखील तुमचा सल्ला ऐकू', असे खडे बोल चंद्रकांतदादा यांना सुनावले आहेत.

सांगलीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, राज्यातील पूर परिस्थिती आणि त्याने झालेले नुकसान पाहता आता मोठे कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सांगलीत एक ऑक्टोंबर रोजी घेणारी इशारा सभा ही ऑनलाईन पद्धतीने घेता येईल का? याबाबत विचार करतोय. अशा परिस्थितीत मोठे कार्यक्रम घ्यावे की नाही हे उद्धव ठाकरे यांनी देखील ठरवावं. तसेच उद्धव ठाकरे यांना ऑनलाईन पद्धतीने दसरा मेळावा घेण्याचा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

यावरूनच आता नव्या वादास सुरूवात झाली असून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी, चंद्रकांत पाटील यांचे मी आभार मानते, कारण पूर परिस्थिती असो वा कोरोना अशा परिस्थितीमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राला हवे आहेत, असं एकूण चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभारामुळे झालेली घोर निराशा आणि अपेक्षाभंग देखील जाणवत आहे, अशा परिस्थितीत ऑनलाईन दसरा मेळावा का? घेऊ नये असं त्यांनी सुचवलं आहे. पाटील यांच्या प्रस्तावाचा विचार करता येईल असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यासंबंधी कल्पना मांडली आहे. निश्चितपणे त्यांच्या कल्पनेचा विचार करता येईल. त्यापूर्वी त्यांनी हा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे देखील ठेवणे आवश्यक आहे. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील सशस्त्र असं संचलन केलं जातं.

सध्या सत्ता तुमची असल्याने संचलन करून शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या पुढे ठेवावे. मोहन भागवत यांचा सशस्त्र पथसंचलना सहित असणारा दसरा मेळावा रद्द करण्याची त्यांनी घोषणा केली की आम्हाला सुद्धा भूमिका मांडणे सोपे जाईल, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT