
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यात उशिरा येण्यावरून उपरोधिक शाब्दिक टीका झाली.
या प्रसंगामुळे कार्यक्रमाचे वातावरण काही काळ तंग झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील विरुद्ध पाटील अशी चर्चा रंगली.
Sangli News : सांगलीतील एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि काँग्रेस नेते तथा अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. तसेच भर कार्यक्रमात उशिरा येण्यावरून चंद्रकांतदादा आणि विशाल पाटील यांनी एकमेकांचे चिमटे काढल्याने याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
येथील धर्मादाय आयुक्त यांच्या मोफत महा आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यात उशिरा येण्यावरून खटके उडाले. यावेळी खासदार मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडे यांच्या दौडीला गेले असतील त्यामुळे उशीर झाला असेल असा चिमटा चंद्रकांतदादांनी काढला. तर यावेळी संधी घालवता विशाल पाटील यांनी देखील चंद्रकांतदादांना टोला लगावला. त्यांनी, चंद्रकांतदादांसारखी आम्हालाही कार्यक्रमाला वेळेत जाण्याची सवय लावून घ्यावी लागेल असे म्हटले. यामुळे आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमातच चंद्रकांतदादा आणि विशाल पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रावर सध्या अतिवृष्टीचे संकट आले आहे. जे कुणाच्याही हातात नाही. आतापर्यंतच्या संकटात महायुतीने कुणालाही वाऱ्यावर सोडलेले नाही. आताही आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राच्या मदतीने मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.
यादरम्यान चंद्रकांतदादा यांनी एक ऑक्टोबर रोजी पडळकर यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या सभेबाबतही मोठी घोषणा केली. त्यांनी, राज्यातील पूर परिस्थिती आणि त्याने झालेले नुकसान पाहता आता मोठे कार्यक्रम घेणे चुकीचे असल्याचे मत मांडले. तसेच याच कारणामुळे भाजपकडून सांगलीत घेण्यात येणारी एक ऑक्टोबर रोजीची इशारा सभा ऑनलाइन घेता येईल का? याची चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
त्याचबरोबर यावेळी चंद्रकांतदादा यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर देखील निशाना साधला. त्यांना इशारा सभेवरून उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत असल्यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावेळी चंद्रकांतदादा यांनी, अशा परिस्थितीत मोठे कार्यक्रम घ्यावे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. हे त्यांनी ठरवावे असाही टोला लगावला आहे.
दरम्यान रंगलेल्या कलगीतुऱ्यादरम्यान विशाल पाटील यांनी, या कार्यक्रमास उशीरा आल्यावरून माफी मागितली. तसेच चंद्रकांतदादांनी काढलेल्या चिमट्याला टोलाही लगावला. त्यांनी, चंद्रकांतदादा वेळेत कार्यक्रमावर पोहोचतात, आता आम्हालाही वेळेत कार्यक्रमाला जाण्याची सवय लागून घ्यावी लागेल, असे म्हटले.
प्र.१: नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील व विशाल पाटील यांच्यात वाद झाला?
उ: उशिरा येण्यावरून उपरोधक टोमण्यांची देवाणघेवाण झाली.
प्र.२: चंद्रकांत पाटील कोणते मंत्री आहेत?
उ: ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत.
प्र.३: विशाल पाटील कोण आहेत?
उ: ते महाराष्ट्रातील अपक्ष खासदार आहेत.
प्र.४: या वादाचा प्रभाव कुठे दिसला?
उ: कार्यक्रमात वातावरण तंग झाले व राजकीय चर्चेला उधाण आले.
प्र.५: हा वाद नेमका कसा झाला?
उ: दोन्ही नेत्यांनी मंचावर एकमेकांवर उपरोधक टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.