Shoumika Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh Sabha : टँकर अन् ठेका यापलिकडे सतेज पाटलांना ज्ञान नाही; शौमिका महाडिकांची खोचक टीका

Shoumika Mahadik On Satej Patil And Hasan Mushrif : 'त्यांना' सर्वसाधारण सभेत बसण्याचा काय अधिकार?

Sunil Balasaheb Dhumal

Kolhapur Political News : 'महाडिकांचे टँकर किती, आणि ठेका कुणाकडे? यापलीकडे माजी मंत्री सतेज पाटलांना 'गोकुळ'बाबत काही ज्ञान नाही. गोकुळची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. त्यात याबाबतच ते बोलतील, अशी टीका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांनी केली. 'आम्ही सत्तेत होतो त्यावेळी ते महादेवराव महाडिकांना सभेत बसण्याचा अधिकार काय असे विचारत होते. आता आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांना या सभेत येण्याचा संबंध काय ?' असा सवालही उपस्थित करून जुना वाचपाही महाडिकांनी यावेळी काढला. (Latest Political News)

कोल्हापूर दूध उत्पादक संघाची अर्थात 'गोकुळ'ची शुक्रवारी सर्वसाधारण सभा शिरगांव येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत (Shoumika Mahadik) शौमिका महाडिकांनी आजी-माजी मंत्र्यांवर सडकून टीका केली. महाडिक म्हणाल्या, 'दूध उत्पादकांनी अनेक तक्रारी मांडल्या आहेत. गोकुळ संघात बदल केला यातच चूक झाल्याची भावना ते व्यक्त करत आहे. मी उपस्थित केलेले प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वीकारले नाहीत. ते स्वीकारण्यासाठी खूप धडपड करावी लागली. दरम्यान, वरिष्ठांच्या सूचना आल्याने प्रश्न स्वीकारण्याची परवानगी नसल्याचे बोर्ड सेक्रेटरीने सांगितले. त्यासाठी कोणाचा दबाव आहे, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे', असेही आवाहनही महाडिकांनी केले.

'गोकुळ दूध संघात (Gokul Dudh Sangh) राजकारणामुळे घसरण होत चालली आहे. अमूल दूध पूर्वी एका तालुक्यात मर्यादित होते, आता जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात अमूल आहे. कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळ हा कणा आहे. हा कणा मोडल्यानंतर शेतकरी उध्वस्त होईल. त्यामुळे आत्ताच आवाज उठवला नाही, तर गोकुळची अवस्था सांगण्यापलीकडे जाईल,' अशी चिंता शौमिका महाडिकांनी व्यक्त केली. 'गोकुळ दूध संघाच्या म्हैस दूध वाढीचा फुगीर आकडा सांगितला जातो. मात्र प्रत्यक्षात पाच कोटी लिटर दुधात घट झाली आहे. जिल्ह्यात बाराशे दूध संस्था वाढवल्या गेल्या, त्यांचे दूध कुठे गेले?,' असा सवालही महाडिकांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

सत्ताधाऱ्यांनी दिलेली अश्वासने पाळली नाहीत, असा आरोपही महाडिकांनी केला. 'जे प्रश्न घेऊन सत्तेत आले ते प्रश्न सोडवले का? दूध उत्पादक शेतकऱ्यांची वासाचे दूध घेणार होता, त्याचे काय झाले? सभेत सत्ताधाऱ्यांनी शांततेने उत्तर द्यावे. मुंबईमधील गोकुळच्या दूधाची विक्री कमी झाली आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल, असे आव्हान महडिकांनी केले. (Maharashtra Political News)

'गोकुळ बचाव कृती समिती स्थापन झाली होती? ती आता कुठे गेली, त्यांना शोधण्याची वेळ आली आहे. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी सर्वसाधारण सभेत संघाच्या मालमत्तेच नुकसान केले. त्यांच्यावर आणि माझ्यावर संस्कार वेगवेगळे आहेत,' असा टोलाही सतेज पाटलांना शौमिका महाडिकांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT