MP Shrinawas Patil News Sararnama
पश्चिम महाराष्ट्र

Shrinawas Patil News : नेहमी मवाळ दिसणारे खासदार पाटील झाले आक्रमक; 'किती नोकऱ्या मिळाल्या?' अधिकाऱ्यांना सांगता येईना...

Umesh Bambare-Patil

Satara News : कौशल्य विकासातून प्रशिक्षण घेतलेल्या किती लोकांना रोजगार मिळाला, हा खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या साध्या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्यामुळे दिशा समितीच्या बैठकीत खासदार पाटील आक्रमक झाले. त्यांनी या योजनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. (Latest Marathi News)

मोदी सरकारने कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये गवंडी, सुतार, लोहार, मेकॅनिक आदी कामे करणाऱ्या नागरिकांना प्रशिक्षित केले जाते. तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. दिशा समितीच्या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी या योजनेचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सातारा जिल्ह्यातील आतापर्यंत किती लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती देता येईल का? असा साधा प्रश्न विचारला. त्यावर अधिकाऱ्यांना घाम फुटला. या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यात या योजनेतून कौशल्य विकास योजनेतून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याच कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. केंद्र सरकार (Central Government) मोठ्या योजना राबवते. त्यांना मोठ-मोठी नावे दिली जातात. परंतु स्थानिक पातळीवर या योजनांचे काम योग्य प्रकारे होत नाही. केंद्र शासनाच्या योजना या घोषणापुरतीच मर्यादित राहत, असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जल जीवन मिशनचा आढाव घेताना सातारा जिल्ह्यात 1556 योजना मंजूर झाल्या असून त्यापैकी जवळपास 403 कामे पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगतात. त्यावर श्रीनिवास पाटील यांनी अधिकाऱ्यांनी या 403 पूर्ण झालेल्या योजनांची पाहणी करावी. ज्या योजनांची कामे नक्कीच पूर्ण झाली आहेत. तसेच नागरिकांना पाणी पिण्याचे पाणी मिळत आहे, अशा गावात काम करणाऱ्या ठेकेदाराचा सत्कार करावा. अन्यथा कागदोपत्री पूर्ण असणाऱ्या योजना आणि काम न केलेल्या ठेकादारांना दंड आकारण्यात यावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT