ashish shelar  amit satam Varsha Gaikwad
ashish shelar amit satam Varsha Gaikwadsarkarnama

Maharashtra Assembly Budget Session 2024 : "राहुल गांधी कुठे तमाशा करतात...", भाजप अन् काँग्रेस आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी

Varsha Gaikwad On Gautam Adani : वर्षा गायकवाडांनी विकासकामे अदाणींना देण्यावरून राज्य सरकारवर टीका केली
Published on

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज बुधवारी ( 28 फेब्रुवारी ) तिसरा दिवस आहे. आज काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी उद्योगपती गौतम अदाणी ( Gautam Adani ) यांच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना लक्ष्य केलं. गायकवाडांनी पंतप्रधान मोदी आणि अदाणींचं नाव घेतल्यानं भाजप आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar ) आणि आमदार अमित साटम ( Amit satam ) यांनी हरकत घेत आक्रमक झाले.

ashish shelar  amit satam Varsha Gaikwad
Basavraj Patil News : बसवराज पाटलांचे कालचे शत्रू आज झाले मित्र; राजकीय उलथापालथीचे परिणाम काय?

नेमकं काय घडलं?

वर्षा गायकवाडांनी ( Varsha Gaikwad ) विकासकामे अदाणींना देण्यावरून राज्य सरकारवर टीका केली. वर्षा गायकवाड म्हणाल्या, "पूर्ण मुंबई विकायला काढली आहे. मुंबईचे विकासक प्रत्येक डीडीआर अदाणींकडून घेतात. अन्य सगळ्या विकासकांना डीसी रूल ( एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस ) आहे. पण, अदाणींनींसाठी वेगळा डीसी रूलची नियमावली तयार करण्यात आली आहे. ते असे कोण आहेत? देशासाठी त्यांनी काय केलं आहे?"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"गरीब मुलांसाठी आम्ही स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधलं. पण, सरकारनं ते विकण्याचं काम केलं आहे. दीड वर्षात फक्त मित्रकाळ पाहिला आहे. मित्रांना कशी मदत करण्यात येईल, हेच पाहण्यात आलं. बांद्र्यातील रिक्लेमेशनसह, एअर इंडिया, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला आणि खारपट्ट्यातील जागा पंतप्रधानाचे आदरणीय मित्र अदाणींना देण्यात आली. सायन कोळीवाडा, सिंधी कॉलनी, घाटकोपरमधील रमाबाई कॉलनी, मुंबई रेसकोर्सही अदाणींना दिलं गेलं," असं वर्षा गायकवाडांनी म्हटलं.

ashish shelar  amit satam Varsha Gaikwad
Shrirampur Municipal Council : मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर विखे अन् काँग्रेसच्या आमदारात श्रेयवादाची लढाई

गायकवाडांच्या विधानानंतर सत्ताधारी गटातील भाजप आमदांनी एकच गोंधळ घालत हरकत घेतली. भाजप आमदार अमित साटम म्हणाले, "सदस्यांनी मुंबई शहराच्या प्रश्नावर बोलावं. पंतप्रधानांचा इथे काय संबंध? मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे? कुठे मस्ती करतात हे सांगू का?"

यानंतर वर्षा गायकवाडांनी म्हटलं, "धारावी, एअर इंडिया, बांद्रा रिक्लेमेशन, मुलुंड, कुर्ला, कांजूरमार्ग, कोळीवाडा अदाणींना दिलं नाही का? मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी पद्धतीनं चालवण्यात आला."

ashish shelar  amit satam Varsha Gaikwad
Sudhakar Badgujar New Chief Shivsena UBT : शहरी जिल्हाप्रमुख शिवसेनेच्या ठाकरे गटाला तारक की मारक?

यावेळी आशिष शेलारांनीही गायकवाडांच्या वक्तव्यावर हरकत घेतली. "काहीही काय बोलताय.... अवास्तव आरोप, असंबंध बोलणं करू नका, असं अध्यक्षांनी सांगितलं. पण, त्यांनी ( गायकवाड ) काय पुरावा दिला आहे? काय पुरावा रेकॉर्डवर ठेवलाय? असत्य आणि असंबंध रेकॉर्डवर जाणार असेल, तर हरकत घ्यायची नाही का?" असा सवाल शेलरांनी तालिका अध्यक्षांना विचारला.

ashish shelar  amit satam Varsha Gaikwad
Lok Sabha Election 2024 : शिंदेंचा खासदार ठाकरेंकडे पुन्हा परतणार? मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com