Shrirampur Gun Fire: मशिदीवरील भोंग्यांविरोधात पोलिसांना निवदेन दिल्यानंतर परतणाऱ्या एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं हा भर दुपारी हा थरार घडला. ज्याच्यावर गोळीबार झाला तो व्यक्ती राष्ट्रीय श्रीराम संघ नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेचा हा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा काही जणांनी पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होण्यात यशस्वी झाला.
श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोडवरील गिरमे चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही गोळीबाराची घटना घडली. संघर्ष बाळासाहेब दिघे (रा. भैरवनाथनगर, होलेवस्ती, ता. श्रीरामपूर) असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी दिघे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून आपल्या फिर्यादीत म्हटलं की, "29 ऑगस्टला दुपारी 12 वाजता मी, सागर बेग, आकाश बेग, रोहित यादव व इतर कार्यकर्ते मिळून मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी श्रीरामपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात गेलो होतो. तिथे लेखी निवेदन देवून आम्ही परतलो, त्यानंतर शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील ‘ग्रॅज्युएट चहा’ दुकानात चहा घेण्यासाठी थांबलो होतो.
यावेळी माझ्या ओळखीचा तरुण हुजेफा शेख हा तिथं आला आणि त्याने माझ्याकडे पाहून विनाकारण कमरेला खोसलेले पिस्तूल बाहेर काढून लोड करण्याचा प्रयत्न केला. मी घाबरून त्याला धक्का देऊन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. परंतू तो खाली न पडता एचडीएफसी बँकेच्या एटीएम शेजारच्या बोळीतून पळून गेला. हा गोंधळ पाहून सोबतचे कार्यकर्ते व मित्र देखील माझ्या मागे धावले. तेव्हा त्याने पळत असतानाच पाठीमागे वळून माझ्या दिशेने पिस्तूलातून दोन फायर केले. मात्र, आम्ही गल्लीतील भिंतीच्या आडोशाला गेल्याने बचावलो. त्यानंतर पुन्हा आम्ही त्याचा पाठलाग केला असता तो सैलानी बाबा दर्ग्याच्या दिशेने पळून गेला.
या थरारक घटनेची माहिती आम्ही पोलिस स्टेशनला माहिती कळवली त्यानंतर काही वेळात श्रीरामपूर पोलीसही घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हुजेफा शेख विरोधात पोलिसांत जीवेमारण्याचा प्रयत्नाची तक्रार दिली. या प्रकरणामुळं शहरात तणावाच वातावरण निर्माण झाले असून गर्दीच्या चौकात झालेल्या गोळीबारामुळं नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.