Kolhapur Water Issue: आमदार धरणावर-जनता रस्त्यावर; आता मुख्यमंत्रीच घालणार कोल्हापुरीत पाणीप्रश्नात लक्ष

Kolhapur Water Issue : ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापूरचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे. पाणी प्रश्नावरून जनता रस्त्यावर उतरली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Water Issue : ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापूरचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे. पाणी प्रश्नावरून जनता रस्त्यावर उतरली आहे. थेट पाईपलाईनच्या पाणीपुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शहराला अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. अशातच जनतेच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरवासीयांच्या संतप्त झालेल्या भावना पाहता भाजपचे नेते आणि दक्षिणचे आमदार थेट काळम्मावाडी धरणावर पोहचले. वारंवार होणाऱ्या थेट पाईपलाईनच्या कामातील घोळामुळे थेट मुख्यमंत्र्यांनाच याबाबतची कल्पना देत येत्या पंधरा दिवसात कोल्हापूरच्या पाणी प्रश्नावर बैठक घेण्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काळम्मावाडी येथे भेट देऊन पाणी उपशाची सद्यस्थिती जाणून घेतली. पाणी उपसा करण्यासाठी एकूण ४ पंप असून त्यापैकी ३ पंप कार्यरत आहेत. शहराची गरज लक्षात घेऊन आणखी दोन पंपची उभारणी करण्यासाठी ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिल्या.

त्याचबरोबर या पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या भूमिगत वीज वाहिनीसाठी १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून उद्यापासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून होणारा पाणीपुरवठा हा अपुऱ्या दाबाने आणि अनियमित होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे कोल्हापूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

यावर पर्याय म्हणून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी जुनी शिंगणापूर योजना पुन्हा कार्यान्वित करावी तसेच या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लवकरात लवकर यासंबंधी बैठक घेऊन कोल्हापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अमल महाडिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान याबाबतची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून येत्या पंधरा दिवसात कोल्हापूरचा पाणी प्रश्न कायमचा निकाल लावण्याची ग्वाही या निमित्ताने दिले आहे.

-------------------------------------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com