RTO Shrirampur
RTO Shrirampur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात राडा

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - महापुरुषांची जयंती साजरी केली नाही असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयला टाळे ठोकले. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्या अंगावर ऑइल सदृश पदार्थ टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ( Rada at the Sub-Regional Transport Office, Shrirampur )

आज (ता. १८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालायला समोर ठिय्या मांडला. त्यानंतर कार्यालयाचे मुख्य गेट बंद केले व घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने बच्छाव यांना फोन करून याठिकाणी बोलावून घेतले. ते आल्यानंतर त्यांना महापुरुषांची जयंती साजरी का साजरी केली नाही याचा जाब विचारला. तसेच त्यांना पुष्पहार घातला. एका कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर ऑइल सदृश पदार्थ टाकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बच्छाव गोंधळून गेले. त्यांनी येथून काढता पाय घेत निघून गेले.

परिवहन अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारात सर्व शहर पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांची भेट घेतली. बच्छाव हे शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या समवेत मोटर वाहन निरीक्षक विनोद घनवट, सुनील गोसावी, जयश्री बागुल, विकास सूर्यवंशी, पद्माकर पाटील, धर्मराज पाटील, उपनिरीक्षक श्वेता कुलकर्णी, अनिल गावडे, मयुरी पंचमुख, सुजाता बाळसराफ व कर्मचारी उपस्थित होते. या घटनेचा चालक मालक प्रतिनिधी संघाच्या वतीने निषेध करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT