Maan Political News :
दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे प्रणित सभासद, सेवक परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुनील पोळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला धक्का बसला आहे.
सिद्धनाथ पतसंस्थेच्या स्थापनेपासून दुसऱ्यांदा व संस्थापक स्वर्गीय वाघोजीराव पोळ यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. संस्थापक स्वर्गीय वाघोजीराव पोळ (काका) सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट ) नेते सुनील पोळ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी निवडणुकीस सामोरे गेले. तर आमदार Jaykumar Gore यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धनाथ सभासद, सेवक परिवर्तन पॅनेल निवडणुकीत उतरले होते.
24 शाखांच्या ठिकाणी 34 मतदान केंद्रावर अतिशय चुरशीने 8656 मतदारांनी आपला हक्क बजावला. तब्बल 75.92 इतके मतदान झाल्याने परिवर्तन होणार याची कुणकुण लागली होती. याचा प्रत्यय आज मतमोजणीत दिसून आला. पहिल्या फेरीपासून व प्रत्येक मतदान केंद्रावर परिवर्तन पॅनेल भरभक्कम आघाडी घेतली अन् ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. मोठ्या मतांच्या फरकाने परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. विद्यमान अध्यक्ष सुनील पोळ यांच्यासह सहकार बचावच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला. ( Satara Politics News )
निकाल हाती येताच परिवर्तन पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत शहरातून विजयी मिरवणूक काढली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वसाधारण मतदारसंघ - अर्जुन चांगदेव काळे, महादेव विश्वनाथ कदम, चंद्रकांत सुदाम जगदाळे, बापू ज्ञानू जाधव, राजेंद्र ब्रम्हदेव जाधव, विजय रंगराव जाधव, दत्तात्रय नथुराम देशमाने व नारायण जगन्नाथ विरकर (Elections )
महिला राखीव मतदारसंघ - नंदाबाई चंद्रकांत दडस व पुनम रणजित पोळ
अनुसूचित जाती / जमाती राखीव मतदार संघ - जयवंत श्रीरंग रोकडे
विमुक्त जाती / भटक्या जमाती राखीव मतदार संघ - बाबासाहेब बाळासाहेब विरकर (मामूशेठ)
इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघ - अरुण दादासो गोरे
अरुण गोरे हे सर्वात जास्त म्हणजे 1955 मतांच्या फरकाने विजयी झाले. तर मामूशेठ वीरकर यांनी 1642 मतांनी विजय मिळवला. साधारण 1700 मतांच्या फरकाने परिवर्तनचे सर्वच उमेदवार विजयी झाले.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.