Crime
Crime  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपुरातील त्या माथेफिरू पतीला सहा दिवसांची पोलिस कोठडी

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

श्रीरामपूर - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात नात्याला कळीमा फासणारी घटना घडली. रामनवमीच्या दिवशी सकाळी पती त्याच्या पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. तसेच या हत्येची माहिती नातेवाईकांना दुरध्वनीद्वारे कळविली. अशा या माथेफिरू पतीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. ( Six-day remand for that headstrong husband: Incident in Shrirampur taluka )

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात पतीने पत्नीचा खून करून मुलाला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिल्याची घटना काल (ता. 10) घडली. याप्रकरणातील आरोपी बलराम दत्तात्रय कुदळे याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्नी अक्षदा व मुलगा शिवतेज यांचा खून केल्यानंतर आरोपीने चाकण येथील मेव्हुणा महेश बोरावके याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती व मृत्यूमुखी पडलेल्या पत्नी व मुलाचे मृतदेह दाखविले. तसेच त्यांचे फोटो काढून नातेवाईकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ही टाकले. घटनेनंतर तो पोलिसात हजर झाला. घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, अक्षदा हिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याचाच राग बालरामच्या डोक्यात अनेक दिवसांपासून होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचा संशय तालुका पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच बलराम हा लहानपणापासून जास्त बोलका नव्हता, तो फारसे कोणाशी बोलत नासायचा असे त्याच्या शालेय मित्राकडून समजले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच गोंधवणी येथील जीवन कुदळे यांचे घर जाळल्या प्रकरणी कोणीही तक्रार आद्यप दिलेली नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. संबंधितांना तक्रार देण्याबाबत कळविले असल्याचे शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले.

घटना घडल्यावर काल (ता. 10 ) मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपी पती भावाच्या घरात जळपोळ केली. त्यामुळे परिसरात तनावाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT