Solapur, 29 May (आप्पासाहेब हत्ताळे) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी खुनाचा प्रकार ताजा असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गोविंदपूर (जि. विजयपूर, कर्नाटक) येथे आज (ता. २९ मे) शेतजमिनीच्या वादातून सामूहीक हत्याकांडाची घटना घडली आहे. गोळीबार करत सहा जणांचा खून करण्यात आला असून त्यात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश आहे. यामुळे गोविंदपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्नाटकातील चडचणच्या (जि. विजयपूर) निराळे कुटुंबीयांनी गोविंदपूरच्या रामपुरे कुटुंबीयांकडून शेतीजमीन खरेदी केली होती. ती शेती खरेदी केल्याचा रागातून शुक्रवारी (ता. २९ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास हे हत्याकांड घडले आहे.
गोळीबाराच्या घटनेमध्ये निराळे कुटुंबातील पाच सदस्यांचा, तर त्यांच्या सोबत असलेल्या मुस्लीम समाजातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे निराळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोविंदपूर येथे येऊन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एकाचा समावेश आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर गोविंदपूर गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. सीमाभागातील ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच चडचण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गोविंदपूरमध्ये बराच काळ गोळीबाराचा आवाज येत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले, गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.