Vidhan Parishad Election : ‘सातारा-सांगली’साठी भाजपचा उमेदवार असणार सातारचा; निष्ठावंतांना न्याय की आयात नेत्याला संधी?

Sangli Satara MLC : सांगली-सातारा विधान परिषद जागा भाजपकडे जाणार असल्याचे स्पष्ट होत असून उमेदवार साताऱ्यातील असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad ElectionSarkarnama
Published on
Updated on

Satara, 29 May : विधान परिषदेचा सांगली-सातारा मतदारसंघ महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे जाणार, हे आता निश्चित झाले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा दिसून येत असून उमेदवार सांगली की सातारा जिल्ह्यातील याबाबत चुरस होती. मात्र, या मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार हा सातारा जिल्ह्यातील असेल, असे सांगण्यात येत आहे. तो निष्ठावंत असणार की बाहेरून आलेला नेता असणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सांगली-सातारा (sangli-satara) विधान परिषद निवडणुकीत सध्या उमेदवारीसाठी जोरदार चुरस दिसून येत आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक संख्याबळ भाजपचे असल्याने हा मतदारसंघ भारतीय जतना पक्षाकडे जाणार आहे, हे निश्चित झाले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सोबत असल्याने भाजपचा विजय निश्चित आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे.

या मतदारसंघात भाजपकडे (BJP) ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे.

मागील निवडणुकीत सांगलीचे मोहनराव कदम यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या निवडणुकीत मात्र सातारा जिल्ह्यातील संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपकडून सातारा जिल्ह्यातील कोणत्या उमेदवाराला संधी दिले जाते, याकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Vidhan Parishad Election
Ram Shinde On Prajakt Tanpure : अहिल्यानगरमध्ये तनपुरेंच्या उमेदवारीची चर्चा : राम शिंदे म्हणाले, ‘निवडणुका जिंकण्यासाठी निष्ठावंत अन्‌...’

सातारा जिल्ह्यातून भाजपचे माजी अध्यक्ष धैर्यशील कदम, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे संयोजक विक्रम पावसकर यांची नावे चर्चेत आहेत. कदम यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री गोरे हे आग्रही आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणीही केल्याची माहिती आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी सभापती सुनील काटकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशी चर्चाही केली आहे. याशिवाय काटकर आणि कदम यांनी स्वतंत्रपणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे साताऱ्यातून तिकिट कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. भाजपकडून आता निष्ठावंतांना संधी दिली जाते की आयात नेत्याला संधी मिळणार, याबाबत औत्सुक्य आहे.

Vidhan Parishad Election
MahaYuti seat sharing: विधानपरिषदेच्या 16 जागांवर फायनल डील, पण 'ती' एक जागा ठरली प्रतिष्ठेची; महायुतीच्या जागावाटपात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट

विधानसभा निवडणुकीत माण मतदारसंघातून शेखर गोरे हे इच्छुक होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यासाठी शेखर गोरे यांनी माघार घेऊन जयकुमार गोरे यांना मदत केली होती. त्या वेळी त्यांना भाजपकडून आमदारकीचा शब्द दिल्याची चर्चा आहे, त्यामुळे शेखर गोरे यांना संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com