Veteran socialist leader Pannalal Surana, known for his lifelong dedication to social reform and journalism, passed away at 93, leaving a lasting legacy in Maharashtra. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pannalal Surana Death : ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा काळाच्या पडद्याआड! वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pannalal Surana Death Passed Away : पन्नालाल सुराणा यांचा सोलापुरातील बार्शीत येथे जन्म झाला. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला होता. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

Jagdish Patil

Pannalal Surana Passed Away : ज्येष्ठ समाजवादी नेते तथा पत्रकार पन्नालाल सुराणा यांचे काल रात्री (ता.02) निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्यामुळे त्यांना सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयुष्यभर समाज हितासाठी झटलेले साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधणानंतर त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयला देहदान केलं जाणार असल्याची माहिती आहे. पन्नालाल सुराणा यांचा सोलापुरातील बार्शीत येथे जन्म झाला.

त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला होता. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. ते नामवंत पत्रकार होते. तसंच मराठवाडा दैनिकाचे संपादक होते.

शिक्षण, शेती, बेरोजगारी अशा विविध सामाजिक विषयावर त्यांनी खूप लिखान केलं आहे. जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या जाण्यामुळे अनेकांनी सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT