- उमेश पवार
Barshi BJP update : बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना शहर आणि तालुक्यात त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ येत्या एप्रिल महिन्यात निश्चितच मिळेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. बार्शीच्या भगवंताला मी देखील साकडे घातले असून भगवंतापेक्षा कोणीच मोठे नाही त्यामुळे बार्शीसाठी एप्रिल महिन्यात गोड बातमी मिळणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
बुधवारी (ता. 18) भाजपच्या एका कार्यक्रमासाठी ते बार्शीत आले होते. त्याप्रसंगी त्यांनी भगवंताचे दर्शन घेत राजेंद्र राऊत यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी, याबाबत ग्रामदैवत भगवंताला त्यांनी साकडे घातले. 'माजी आमदार राऊत यांना भाजप देणार मोठे 'गिफ्ट'? या मथळ्याखाली 'सकाळ'ने बुधवारी (ता. 18) वृत्त प्रकाशित केले होते.
याबाबतही राऊत यांना विधानपरिषदेवर घेण्यावर त्यांनी अनुकूलता दर्शवली. भगवंतापेक्षा कोणीच मोठे नाही. एप्रिल महिन्यात राऊत यांना न्याय मिळाल्यावर पुन्हा एकदा मी भगवंताच्या दर्शनाला येणार आहे, असा विश्वासही त्यांनी 'सकाळ'ला बोलताना व्यक्त केला.
राजेंद्र राऊत यांचे शहर व तालुक्यात खूप चांगले काम आहे. त्यामुळे त्यांना निश्चितच फळ मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत यावेळी राऊत यांना शुभेच्छाही मंत्री पाटील यांना दिल्या. बाजार समितीच्या उल्लेखनीय यशाबद्दल ऍड. रणवीर राऊत यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदारसिंह सावंत यांनी युवा मोर्चाचे अध्यक्षपद बहाल केले होते. त्याप्रमाणे राऊत यांनाही चांगली संधी दिली जाईल याबाबत बार्शीकरात उत्सुकता लागली आहे.
यावेळी मंदिरात देवस्थानचे दिलीप बुडूख, भाजपच्या पद्मजा काळे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक प्रशांत कथले, कुंडलिक गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी पुजारी योगेश बडवे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भगवंताची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.