Solapur News : वडाळा (ता. उत्तर सोलापूर) : येथे ग्रामदैवत शेख फरीद बाबा दर्गा येथे बुधवारी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्नेहभोजन संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने आदी मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी ग्रामदैवत शेख फरीद बाबा दर्ग्यावर फुलांची चादर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने साठे यांच्याविरुद्ध सर्व विरोधकांनी एकत्र येत वडाळ्यातूनच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व वडाळा ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत साठे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पराभव यशवंत माने यांना जिव्हारी लागला आहे. याचे उट्टे काढण्यासाठी यशवंत माने यांनी साठे यांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरवात केली आहे. माजी आमदार दिलीप माने लवकरात भाजपत (BJP) दाखल होणार आहेत.
मात्र, दक्षिण भाजपमधून होणाऱ्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश रखडला आहे. तरीही त्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार हे निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे उत्तर सोलापूर (Solapur) तालुक्यात भाजपचे चांगलेच बळ वाढणार आहे. आज वडाळा येथे ग्रामदैवत शेख फरीद बाबा सभामंडपात वडाळ्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने नान्नज व बीबीदारफळ जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन संवाद मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यासाठी माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, यशवंत माने, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी दडे, योगेश गवळी, बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, अरुण बारसकर, जीवन साठे, मनोज मोहिते, दिलीप सोंडगे, अनंत सुभेदार, राजेंद्र गाडे, दिनेश साठे, मिलिंद साठे, सुनील भोसले, मंजूर शेख, गोपाळ मसलखांब, श्रीकांत मुळे, नीलेश गवळी, भारत बोंगे, प्रवीण भालशंकर आदी उपस्थित होते.
उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अनेक जण आपल्या गॉडफादरमार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार म्हणाले, उमेदवारी देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुका व भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसह नऊ जणांवर जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही सर्वजण एकत्र बसून उमेदवारी फायनल करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.