Solapur, 07 July : भाजपच्या शहराध्यक्षांनी स्थगिती दिलेली भारतीय जनता युवा मोर्चाची सोलापूर शहर कार्यकारिणी तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मंगळवारी (ता. ७ जुलै) शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी घोषित केली. जुन्या कार्यकारिणीतील तुषार पवार, विशाल बनसोडे या दोन सरचिटणीसांना डच्चू देण्यात आला असून चारऐवजी तीनच सरचिटणीस ठेवले आहेत. काहींच्या पदांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कार्यकारिणीवर आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख विरोधकांचा वरचष्मा असल्याने त्यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
भाजप शहर कार्यकारिणी घोषित होऊन पाच महिन्यांनंतर भाजयुमोचे शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी ८३ जणांची कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यानंतर १२ दिवसांत ती कार्यकारिणी सर्वसमावेशक नसल्याचे कारण सांगत शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी या कार्यकारिणीला स्थगिती दिली होती.
आता नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून बाबुराव घुगे यांचे पुत्र मयुर घुगे यांना सरचिटणीसपदी, तर सरचिटणीस विशाल बनसोडे यांना चिटणीसपदी नियुक्त केले आहे. नगरसेवक बिज्जु प्रधाने यांचे पुतणे अनिकेत प्रधाने यांना चिटणीस पदावरून हटवून उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. गुरुनाथ कोळी, अनिरुद्ध पाटील यांना चिटणीस पदावरून डच्चू दिला असून चिटणीस असलेले रोहित गोरे यांना मीडिया संयोजकपदी नेमले आहे.
उपाध्यक्षपदी राहुल डांगरे, ऋषिकेश चिट्टे, रविकांत कांबळे, ओंकार पत्तेवार यांना संधी दिली असून अमर एक्कलदेवी, धीरज बंदपट्टे, संदीप महाले, निशांत सावळे, कपिल कावळे, केतन अंजिखाने यांना वगळले आहे, तर शिवानंद कावडे यांना शहर मध्य विधानसभा संयोजकपदी नेमले आहे.
कार्यकारिणी अशी : सरचिटणीस : विश्वनाथ प्याटी, मयूर घुगे, यतिराज होनमाने. शहर उपाध्यक्ष : रोहित तडवळकर, राहुल डांगरे, आकाश मुदगल, अनिकेत प्रधाने, अंबादास पामू, लक्ष्मण सरवदे, ऋषिकेश चिट्टे, रविकांत कांबळे, प्रविण गलांडे, ओंकार पत्तेवार, रवी कमलापुरे. चिटणीस : विशाल बनसोडे, रोहित हंचाटे, रोहन मराठे, डोंगरेश चाबुकस्वार, नरेश दासरी, गणेश पवार, सुरज विटे, रोहन किणगी, ओंकार गुंड, श्रीनिवास दासरी. कोषाध्यक्ष : कृष्णा झंवर.
शहर कार्यकारणी सदस्य : अथर्व शहाणे, सिद्धांत धोत्रे, विकास कारके, संगमेश केलूर, सुमित पतंगे, विशाल अंबलगी, विक्रांत माळवदकर, ओंकार शिंदे, स्नेहल शिंदे, युवराज चव्हाण, नितीन भोपळे, अश्विन कोडम, जय पतंगे, गुरुनाथ कोळी, रविराज हरसुरे.
विधानसभा संयोजक : शहर उत्तर : अर्जुन मोहिते, शहर दक्षिण : सिद्धेश्वर माळी, शहर मध्य : शिवानंद कावडे, शहर संपर्क प्रमुख : संदीप महाले, विद्यार्थी आघाडी संयोजक : शिरीष गायकवाड, सोशल मीडिया संयोजक : रोहित गोरे. मंडल अध्यक्ष : शहर उत्तर पूर्व : प्रशांत गायकवाड, शहर उत्तर पश्चिम : प्रथमेश जोशी, शहर मध्य पूर्व : देवेंद्र डेरभेरे. शहर मध्य मध्य : ओंकार होमकर, शहर मध्य पश्चिम : श्रवण साबळे, शहर दक्षिण पूर्व : रविराज वाघमोडे, शहर दक्षिण पश्चिम : प्रदीप मोरे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.