Ashok Kharat  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Kharat : अशोक खरातच्या अडचणीत वाढ : सोलापूर न्यायालयाची खरातसह सहा जणांना नोटीस

Kalman Land Case : शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत खरेदी केल्याच्या प्रकरणात अशोक खरात आणि अन्य पाच जणांना सोलापूर न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 19 July : कमी किमतीत शेतकऱ्याच्या जमीन लाटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्यासह सहा आरोपींना सोलापूरच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अशोक खरात याने खरेदी केलेल्या जमीनसंदर्भात काय निर्णय लागतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नाशिकचा भोंदू अशोक खरात याने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीतील जमीन खरेदी केली आहे. कळमणमधील राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी ॲड. योगेश नागनाथ पवार यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या सागर जाधव यांच्या न्यायालयाने अशोक खरात याच्यासह एकूण सहा आरोपींना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.

खासगी फिर्यादीत आरोपी खरातसह सहा जणांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल. या फिर्यादीमध्ये कॉग्निझन्स घेण्यापूर्वी आरोपीलाही ऐकून घेण्याची संधी मिळावी, म्हणून कोर्टाने सर्व आरोपीना नोटीस काढली असल्याचे ॲड. योगेश पवार यांनी सांगितले.

फिर्यादीनुसार, बनसोडे यांची ११ एकर ०८ गुंठे शेतजमीन खरात याने अत्यंत कमी किमतीत लाटली आहे. त्यानंतर तीच जमीन खोटी फळबागायत दाखवून कोट्यवधी रुपयांना विकण्यात आली आहे. तसेच, आरोपी अशोक खरात हा जादूटोणा व अंधश्रद्धेचा आधार घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

सोलापूर न्यायालयाच्या आदेशामुळे हे प्रकरण पुढील सुनावणीच्या टप्प्यात पोहोचले आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड. योगेश नागनाथ पवार हे बाजू मांडत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT