Kumar Saptarshi : कुमार सप्तर्षींमुळे सोलापूरला मिळाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Solapur Medical College : १९७२ मधील 'दमाणी हटाव' आंदोलनात कुमार सप्तर्षी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे शासकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी मोठा संघर्ष केला, अशी आठवण माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितली.
Kumar Saptarshi
Kumar SaptarshiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 July : सोलापूर येथील तत्कालीन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात जून १९७२ मध्ये गुणवत्तेच्या आधारे प्रवेश न देता, विद्यार्थ्यांकडून 'कॅपिटेशन फी' (डोनेशन) घेऊन प्रवेश दिले जात होते. या पद्धतीला विरोध करण्यासाठी 'दमाणी हटाव' आंदोलन करून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे शासकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यात कुमार सप्तर्षी यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांच्या आठवणी आजही माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह अनेक जण सांगतात.

डॉ. कुमार सप्तर्षी हे जेव्हा विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी सोलापुरात आले, तेव्हा ते केवळ विद्यार्थ्यांचे नेते राहिले नाहीत. सोलापूरच्या कामगारांचा, मिल मजुरांच्याही लढ्यात ते सहभागी झाले होते. मात्र, विद्यार्थी लढ्यात मिळालेले यश कामगारांच्या लढ्यात मिळाले नाही, अशी आठवण आडम यांनी सांगितली.

युक्रांद चळवळ आणि सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. अरुण लिमये यांनी एकत्रित लढा दिला होता. दोघेही युवक क्रांती दलाच्या माध्यमातून सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक वैद्यकीय व इतर महाविद्यालयांमधील तरुणांना सामाजिक चळवळींकडे आकर्षित केले, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर यांनी सांगितली.

सोलापूर येथे १९७२ च्या दरम्यान झालेल्या ऐतिहासिक कामगार आणि विद्यार्थी संपांमध्ये या दोन्ही डॉक्टरांनी सक्रिय भूमिका घेतली होती. या आंदोलनादरम्यान तत्कालीन सरकारने कुमार सप्तर्षी आणि अरुण लिमये यांना अटकही केली होती. त्याचे तीव्र पडसाद सोलापूरच्या विद्यार्थी वर्गात उमटले होते. हे दोन्ही नेते पेशाने डॉक्टर असूनही त्यांनी वैद्यकीय व्यवसायाचा आर्थिक फायदा न घेता आपले आयुष्य शोषित, वंचित आणि दलितांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यामुळे सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर त्यांचा मोठा आदर्श होता.

Kumar Saptarshi
Sonam Wangchuk : आंदोलन, उपोषण कराल तर...: केंद्राने आणलेल्या कायद्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचे भाष्य

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी येरवडा विद्यापीठाचे दिवस या पुस्तकात सोलापूरच्या लढ्याबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या असून त्यांना वेगवेगळ्या आंदोलनासाठी ३५ वेळा अटक झाली हेाती. त्यांना करमाळा, बार्शी तसेच धारशीव येथील तुरुंगात ठेवल्याचे ते सांगतात. याबरोबरच मोहोळ येथील अनिल कोर, बार्शी येथील तानाजी ठोंबरे यांनीही कुमार सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून मोहोळ व बार्शी येथे कुमार सप्तर्षी यांची व्याख्याने झाली आहेत.

कुमार सप्तर्षींमुळे माझे व्यक्तिमत्त्व घडले

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे माढा तालुक्याशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी माढा तालुक्यात व्यापक जनसंपर्क निर्माण केला होता. त्यांच्या पुढाकाराने तालुक्यात युवक क्रांती दलाच्या अनेक शाखा स्थापन झाल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क होता. माढा येथील नगरसेवक दिनेश गाडेकर तसेच दारफळ येथील अभिजीत शिंदे यांच्या घरी त्यांचे नियमित येणे-जाणे असे.

Kumar Saptarshi
Rahul Gandhi : सोनम वांगचुकांच्या विरोधात पोलिसांचा वापर, अखेर राहुल गांधींनी मौन सोडलं, मोदी सरकावर घणाघात; म्हणाले…

‘आमच्यातील नेतृत्वगुणांचा विकास करण्यास आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा विचार रुजविण्यास डॉ. कुमार सप्तर्षी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझे व्यक्तिमत्त्व घडले,’ अशा भावना माढ्याचे नगरसेवक दिनेश गाडेकर यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com