आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency 2024) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोलापुरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'किंगखान' अभिनेता शाहरूख खान प्रणिती शिंदे यांचा प्रचार करीत असल्याचा दावा करण्यात आला होता. आता प्रणिती शिंदेंनी आपल्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सहभागी शाहरूख खान हा नसून त्याच्यासारखा दिसणारा एक तरुण आहे. या डुप्लिकेट शाहरुखला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अशातच आता प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोला ओ... हे रॅप सॉंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
'मुद्द्याचं बोला ओ' हे रॅप सॉग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर केली आहे. या रॅप सॉगमध्ये सोलापूरकर तरुणांनी महागाई, बेरोजगारी, स्मार्ट सिटी, विमानतळ, आय टी पार्क, पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना त्यांनी जाब विचारला आहे. प्रणिती शिंदे यांनी आपल्या इंस्टावरून ही पोस्ट केली आहे.
गेल्या दहा वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळालं? ह्याचं उत्तरच मिळत नाही. सत्ताधारी केवळ मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याकडेच जोर देताना दिसत आहेत. त्यामुळेच सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉंगच्या माध्यमातून प्रश्न , “मुद्द्याचं बोला ओ!” म्हणत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहे. प्रणिती शिंदेंच्या विरोधात महायुतीकडून आमदार राम सातपुते हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.