Ajit Pawar News: मोदींच्या सभेसाठी एस.पी. कॉलेजचे मैदानच का? अजितदादांनी सांगितलं कारण...

PM Modi Meeting IN Pune: कात्रजचा परिसर निवडण्याचा विचार होता. मात्र या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात सभा ठिकाणाची व्यवस्था होत नसल्याने आता एस. पी. कॉलेज येथे ही सभा घेण्याचं निश्चित करण्यात येत आहे.
PM Modi Meeting IN Pune
PM Modi Meeting IN PuneSarkarnama

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रचारसभा पुण्यामध्ये 29 एप्रिलला होणार आहे. यासाठी महायुतीतील सर्वच नेते कामाला लागले आहेत. मोदींच्या या सभेचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. या सभेबाबतचा तपशील खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच सांगितला आहे.

खडकवासला मतदारसंघांमध्ये आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, "खडकवासला विधानसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख म्हणून आमदार भीमराव तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांचे प्रचार कार्यालय खडकवासला मतदारसंघात महावीर जयंतीच्या निमित्ताने उघडण्यात आले आहे.

अजित पवार म्हणाले, "या भागात महायुतीतील सर्वच मित्र पक्षांनी आपली प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवणे आवश्यक आहे. या भागातील जे प्रश्न आहेत. ते माझ्या आवाक्यातील असून त्या प्रश्नांची सोडवणूक योग्य प्रकारे होईल याबाबत मतदारांना आश्वासक करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायचे आहे."

अजित पवार म्हणाले, उद्या सायंकाळी सात ते दहा या वेळामध्ये खडकवासला मतदारसंघांमध्ये मी प्रचार करणार आहे. उद्या सुजय विखे पाटील आणि श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. 25 तारखेला मुरलीधर मोहोळ आणि आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी प्रचार रॅली काढून नदीपात्रामध्ये सभा देखील होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

PM Modi Meeting IN Pune
Narendra Modi News: विदर्भातील नेत्यांना मोदींनी विचारला जाब; नागपूरमध्ये मतदान कमी का?

29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. यासाठी शिरूर, बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती अशा भागात ही सभा घेण्याचं नियोजन सुरू होतं. त्यासाठी कात्रजचा परिसर निवडण्याचा विचार होता. मात्र या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात सभा ठिकाणाची व्यवस्था होत नसल्याने आता एस. पी. कॉलेज येथे ही सभा घेण्याचं निश्चित करण्यात येत आहे. या ठिकाणी 40 हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. त्याप्रमाणे इतर मोठी ग्राऊंडची उपलब्धता झाली नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

तसेच याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये रोडशो होणार असून यामुळे वातावरण मोदीमय आणि महायुतीमुळे होण्यास मदत होणार असं त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून चारही मतदारसंघातून मोदींच्या विचारांचे उमेदवार लोकसभेत गेल्यास केंद्राचा निधी येण्यास मदत होणार आहे. मात्र वेगळ्या पक्षाचा उमेदवार गेल्यास तो फक्त भाषण करण्याशिवाय काहीच करू शकणार नाहीत, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना लगावला.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com