Rohit Pawar- Praniti Shinde
Rohit Pawar- Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापूर मतदारसंघ कुणाचा ? ; दोन्ही काँग्रेसच्या भांडणात आता नवी एन्ट्री

सरकारनामा ब्युरो

हुकूम मुलानी

Solapur Lok Sabha Constituency : सोलापूर लोकसभा मतदार संघ (Solapur Lok Sabha Constituency )कोण लढविणार यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहेच. यात आता बहुजन रयत परिषदेने एन्ट्री घेतली आहे.

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे (ढोबळे) यांनी दोन्ही आमदारावर गंभीर आरोप करीत टीका केली आहे. "महाराष्ट्र भिकेला लागला तरी माझा मतदार संघ शाबूत राहिला पाहिजे, अट्टाहास करणारी टोळी सक्रिय होताना दिसत आहे," असा आरोप साळुंखे यांनी केला आहे.

काँग्रेस उमेदवाराचा सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सलग दोन वेळा पराभव झाल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा. राष्ट्रवादी ती जागा लढवण्यास सक्षम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच केला आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले होत. रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पवार यांच्या दाव्यावर चेतन नरोटे यांनी हा मतदार संघ बारामती काँग्रेसकडे सोडावा, अशी मागणी केली पवार यांच्या त्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्या बोलण्याला कोण रोहित पवार?, काही लोकांमध्ये पोरकटपणा असतो लवकरच त्यांना मॅच्युरिटी येईल असे उत्तर देत रोहित पवारांची मागणी फेटाळली आहे.

या दोन्ही आमदाराच्या मतदारसंघ कोणाकडे असावा या विषयावर दावेदारी असतानाच भाजपाचे नेते लक्ष्मण ढोबळे यांची कन्या अॅड कोमल साळुंखे( ढोबळे) यांनी या दोघांच्या दावेदारीचा खरपूस समाचार घेतला आहे.

"लोकप्रतिनिधी म्हणून कोणाची कितवी टर्म आहे ? हे कामाने नाही, तर पब्लिसिटी स्टंटने किंवा वडिलोपार्जित विरोध जिवंत ठेवून विरोधकाचा वारसा चालवून चालु आमदारांनी विधान भवन सोडून नळावरची ॲसेंब्ली गाजवण्याचा वाफळ प्रयत्न करण्यात वेळ घालवू नये अशाने जिल्ह्यातले ऐरणीवरचे प्रश्न सुटणार नाहीत. पुढचा आमदार कोण असेल हे जनता ठरवेलच पण चालु आमदारांनी आपल्या आमदारकीत एखादा ऐतिहासिक निर्णय घ्यावा किंवा एखाद वर्षानुवर्ष रखडलेलं काम स्वतःच्या आमदारकीमध्ये पार पाडण्यात धन्यता मानावी. जेणेकरून आमदार हो न हो पण जनहिताच्या कामाने कायम जनतेच्या मनात राहण्याची जागा तरी कायम राखता येईल, अशा शब्दात बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे(ढोबळे) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT