Shiv Sena symbol row : धनुष्यबाण हाती घेऊन मुख्यमंत्र्यांनी केला वाढदिवस साजरा..

CM eknath shinde Birth Day news : 'धनुष्यबाण आमचाच'
Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi Sarkarnama

CM eknath shinde Birth Day latest news : धनुष्यबाण कोणाचा ? ठाकरे की शिंदे गटाचा, याबाबतचा सध्या निवडणूक आयोगात युक्तिवाद सुरु आहे. धनुष्यबाणावरुन ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

काल (बुधवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय द्यावा, असे ठाकरे म्हणाले. सोळा आमदाराच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे.

Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
PM Narendra Modi : भाजपच्या खासदारांना व्हीप ; '13 फेब्रुवारीपर्यंत.."

शिवसेनेतून फूटलेल्या शिंदे गटाने मात्र 'धनुष्यबाण आमचाच' असा निर्धार यापूर्वीच अनेकदा केला आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात धनुष्य़बाण घेऊन त्याचा पुनरुच्चार केला आहे.

कोपरी रेल्वे उड्डाणपूलाचे उद्धघाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांचा वाढदिवशानिमित्त केक कापण्यात आला. आमदार प्रताप सरनाईक, प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी केक कापल्यानंतर हातात धनुष्यबाण घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. मुंबईत शिंदे यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत केक तयार केले आहेत. सामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून ओळख करून देणारे एकनाथ शिंदे अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना आवर्जून उपस्थितही राहत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी आणखी एका केकची जोरदार चर्चा आहे. तेदेखील शिंदे यांच्या ठाण्यात. हा केक आहे ५० खोके.. असं लिहिलेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा केक कापला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी हा विशेष केक तयार केला होता.

महाविकास आघाडी सरकार उलथवून देण्यासाठी खोके घेतल्याचे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठ सोडायला तयार नाहीत. मात्र, शिंदे यांनी आपल्या वाढदिवशी धनुष्य़बाण हाती घेऊन ठाकरे गटाला इशारा दिला असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com