Ram Satpute, Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha Election: 'बीडचं पार्सल बीडला पाठवा'; सातपुतेंविरोधात 'पोस्टर वॉर'; स्थानिक विरुद्ध उपरा वाद रंगला

Lok Sabha Election 2024: राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तुमचं स्वागत आहे, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते. असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Ram Satpute Vs Praniti Shinde: सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये, सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या (Solapur Lok Sabha Election) रिंगणात तुमचं स्वागत आहे, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते. असा मजकूर लिहिण्यात आला आहे. पत्राच्या माध्यमातून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सातपुते हे आयात केलेले उमेदवार असून, आपण सोलापूरची लेक असल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तर प्रणिती शिंदेंच्या पत्राला सातपुते यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलं आहे.

सोलापूर (Solapur) मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रव्यवहार सुरू असतानाच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम सातपुतेंच्या (Ram Satpute) विरोधात प्रचार करायला सुरुवात केली आहे. 'बीडचं पार्सल बीडला पाठवा' अशा आशयाचे पोस्टर्स तयार करून काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांकडून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. त्यामुळे सोलापुरात राम सातपुतेंच्या उमेदवारीवर काँग्रेसकडून ते स्थानिक नेतृत्व नसून बाहेरून आयात केलेले उमेदवार असल्याचं चित्र रंगविण्यात येत आहे. त्यामुळे राम सातपुतेंच्या सोशल मीडियाकडून (Social Media) या पोस्टला काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकंदरीतच प्रणिती शिंदेचे (Praniti Shinde) पत्र आणि सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर केला जाणार प्रचार पाहता. सोलापूर मतदारसंघातील निवडणुचा मुद्दा हा स्थानिक उमेदवार विरुद्ध उपरा उमेदवार अशी होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

Solapur Lok Sabha Election

प्रणिती शिंदेंनी पत्रात नेमकं काय लिहिलं?

"मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. तसेच, या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला जी संधी मिळालीये त्याबद्दल शुभेच्छा देते."

राम सातपुतेंच प्रत्युत्तर

"ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! गेल्या 5 वर्षांत माळशिरस विधानसभा (Malshiras Assembly) मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील. माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा!" महायुतीने सोलापूरमधील आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रणिती शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता इथून पुढे सातपुते आणि भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसला कसं उत्तर देणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT