Kolhapur Loksabha Candidate : मंडलिकांना मुख्यमंत्र्यांचा फोन; महायुतीचा उमेदवार उद्या घोषित करणार

Lok Sabha Election Latest Updates : महायुतीच्या उमेदवाराबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण असल्याने या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे.
Kolhapur Loksabha
Kolhapur LoksabhaSarkarnama

Kolhapur Loksabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. महायुतीच्या उमेदवाराबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण असल्याने या मतदारसंघातून खासदार संजय मंडलिक किंवा भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू होती. मात्र, माध्यमांमधून येणाऱ्या माहितीमुळे (Mahayuti) महायुतीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भेटीनंतर संजय मंडलिक यांची उमेदवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याचे समजते. मंगळवारी त्यांच्या नावावर अधिकृत घोषणा होणार आहे. केवळ औपचारिकता बाकी असल्याचे सांगत खासदार मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचाराला सुरुवात करा, असे आदेश दिलेत. मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार संजय मंडलिक (Sanjay Madlik) यांच्याशी फोनवर चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगत खासदार संजय मंडलिक यांनी तुमची उमेदवारी ठरली असून, तुम्ही कामं सुरू ठेवा अशा सूचना दिल्या आहेत. माध्यमात येणाऱ्या बातम्यांमधून संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. (latest News Kolhapur Politics)

Kolhapur Loksabha
Lok Sabha Election Latest Updates : मोठी बातमी! मतदानाच्या दिवशी सुटी, सवलत न दिल्यास होणार कारवाई

माझ्यासह अनेक खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्या बाजूने ठाम राहत उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. कामाला लागा, असे आदेश त्यांनी दिले असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खासदार यांना प्रचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. घटक पक्षातील नेत्यांसोबत बोला, भावना समजून घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले.

महायुतीतील सर्व नेते आम्ही सगळे एकसंघ आहोत, सगळे कामाला लागले आहेत. उद्या उमेदवारीच्या घोषणेनंतर सगळे कामाला लागतील. आज हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समरजितसिह घाटगे यांची भेट घेणार आहेत. शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) हेदेखील मला काल भेटले असून, त्यांनी निवडणुकीला उभारणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, व्यक्तिगत पातळीवर ही निवडणूक होणार नाही. आघाडी आणि महायुती अशी ही लढत होईल. सध्याच्या परिस्थितीत मी त्यांना उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे बघेन, अशी प्रतिक्रिया मंडलिक यांनी दिली.

R

Kolhapur Loksabha
Praniti Shinde Vs Ram Satpute : 'बाहेरचा उमेदवार' म्हणून डिवचणाऱ्या प्रणितींना सातपुतेंचं जशास तसं उत्तर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com