Solapur News : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यासारखे नेते जर आमच्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येणार असतील तर याचा आम्हाला फायदाच होणार नाही. संविधानान संरक्षणाच्या लढ्यासाठी जेवढे नेते आमच्यात सामील होतील, त्याच प्रमाणात आमच्या जागाही वाढतील, असा दावा सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. (Lok Sabha News 2024)
प्रणिती शिंदे यांनी आज आपला प्रचार दौरा केला. सोलापुरातल्या मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, धर्मगाव, ढवळस, शरदनगर, देगाव, घरनिकी, मरापूर, महंमदाबाद, गुंजेगाव, लेंडवेचिंचाळी, शिरसी, डोंगरगाव, बठाण अशा १३ गावातल्या नागरिकांशी - मतदारांशी भेटीगाठी घेतल्या. प्रचंड रणरणतं ऊन असतानाही मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आमदार प्रणिती शिंदे यांना भेटण्यासाठी येत होत्या.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्याावर, मी नेहमी विकासाच्या मुद्यावर बोलत राहिले आणि माझ्या विरोधकांना विकासावर बोलावं अशी माझा आग्रह राहिला. मात्र विरोधकांनी नको तेच मुद्दे चर्चे आणले, मात्र वेगळीकडे प्रचाराचा मुद्दा घेऊन जाण्याची गरज नाही. तुमच्या पक्षाचा 10 वर्ष खासदार राहिला आहे, १० वर्षात काय केलं याचा हिशेब द्या? असे म्हणत त्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना टोला लगावला.
गावागावातल्या शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल नैराश्य आहे. सगळ्याच बाबतीत लोकांची फसवणूक झाली आहे, असेही शिंदे म्हणाल्या. मागी 10 वर्षात विकासाचा अनुशेष राहिला आहे. सोलापूरच्या युवांच्या हाती रोजगार नाही. शहरात आणि जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शिक्षण संस्थांचा प्रश्न आहे. नवनवे उद्योगधंदे सोलापूरमध्ये आणणे प्राधान्यक्रमावर असून माझ्या शहाराला आयटी सिटी बनवायचे असल्याचे प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.