Ajit Pawar News : सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्ह वापरताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी चिन्हाचा निकाल न्यायप्रविष्ट असल्याचे वर्तमानपत्रात जाहीर करण्याचे तसेच चिन्ह वापरताना तसे त्या खाली लिहिण्याची सूचना केली होती. मात्र, ही सूचना पाळली जात नसल्याचे सांगत 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाने आक्षेप घेतला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अवमानाचा ठपका ठेवण्याची मागणीदेखील केली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून न्यायालयात यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर (NCP)अवमानाचा ठपका ठेवण्यास नकार दिला. तसेच दोन्ही बाजूंना समज दिली. आदेशाचे पालन करताना काही अटी शिथिल करण्याची मागणीदेखील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वकिलांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी हे चिन्ह वापरण्यासंदर्भात आक्षेपार्ह पद्धतीने ट्विट केले होते. त्यावरदेखील वकिलांनी हरकत घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटचा विषय निघाला असता ते ट्विट डिलीट केले असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने आव्हाड यांना तोंडी समज दिली. दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून घड्याळ चिन्हासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात दिल्या असल्या तरी मजकूर सर्वत्र दिला गेला नाही, असा आक्षेप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वकिलांनी घेतला.
दोन्ही गटांनी त्यांना दिलेल्या चिन्हासह निवडणुकीला सामोर जावे. तसेच चिन्हांच्या वापराबाबत पूर्वीच्या निर्देशांचे पालन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कार्यकर्ते यांना चिन्ह वापरताना असे निर्देशाचे पालन करताना अडचणी येत असल्याचेही राष्ट्रवादी (अजित पवार) वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.