Solapur NCP News, Baliram Sathe
Solapur NCP News, Baliram Sathe  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP News : ''शरद पवार अध्यक्ष राहिले तरच...''; जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंच्या भूमिकेनं राष्ट्रवादीत अस्वस्थता

सरकारनामा ब्यूरो

दयानंद कुंभार -

Wadala : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन मंगळवारी(दि.२) झालं. याच कार्यक्रमातील भाषणात त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. या अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं राजीनामास्त्र सुरु झालं आहे. याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी मोठं विधान केलं आहे.

शरद पवार यांनी मुंबईतील कार्यक्रमात सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात विशेषतः पक्षांतर्गत नेते व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात खळबळ उडाली. सोलापूर जिल्ह्यातही पवारांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. जर पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिले तरच सक्रीय राजकारणात राहु अन्यथा राजकीय संन्यास घेऊ अशी भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बळीराम साठे(Baliram Sathe) हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. बळीराम साठे यांनी शरद पवार हेच आपला पक्ष आहेत असे वेळोवेळी पवारांच्या उपस्थितच आपल्या भाषणातून ठामपणे सांगितले आहे. हे सर्वश्रुत आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयाने बळीराम साठे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

साठे म्हणाले, शरद पवारां(Sharad Pawar)शिवाय राष्ट्रवादी पक्ष अशक्य आहे. शरद पवार यांना प्रेरणास्थान मानूनच आजवर राष्ट्रवादीत राहून सक्रीय राजकारण समाजकारण केले. त्यांच्याशी एक विशेष नातं आहे. तेच आमच्या भावना समजू शकतात. त्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर पवारसाहेबांशी निगडीत ज्येष्ठ नेते दुरावले जाऊ शकतात.

जर पवारसाहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिले तरच सक्रीय राजकारणात राहू अन्यथा राजकीय संन्यास घेऊ अशी भूमिका घेत असल्याचे बळीराम साठे यांनी सांगितलं आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT