Ranjitsinh Mohite Patil Will join Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil: पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदार काँग्रेसच्या वाटेवर; दिल्लीत घेतली पक्षश्रेष्ठींची भेट

Mangesh Mahale

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

माढा विधानसभा लढवण्यास रणजितसिंह हे इच्छुक असल्याचे बोलले जाते. साम टिव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला माढ्याची जागा सोडली तर रणजितसिंह मोहिते यांचा नावाचा विचार होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त काल रविवारी मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी उपस्थिती लावली. Ranjitsinh Mohite Patil Will join Congress

या कार्यक्रमाला रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले.

या शक्तीप्रदर्शनानंतर अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले. ते पवारांसोबत चर्चा करणार आहेत. ते अजितदादांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. माढ्याची जागा काँग्रेसला गेली तर बबन शिंदे यांची अडचण होणार असल्याचे बोलले जाते.

"सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायची माझी तयारी आहे", असं म्हणत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल (रविवारी) मोठे संकेत दिले आहेत. अकलूजमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोठं भाष्य केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत हे धैर्यशील यांच्या प्रचारापासून ते दूर होते, ती उत्सुकता संपवत रविवारी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थिती लावत धडाकेबाज भाषण केले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीसोबत जाणार का? यांचे उत्तर लवकरच मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT