Uday Samant: उद्योगमंत्र्यांची हरवलेली 'ती' महत्त्वाची वस्तू अजितदादांकडे सापडली...

Pune Metro Program Uday Samant lost his phone: पुण्यातील मेट्रो कार्यक्रमात माझ्या शेजारी अजितदादा बसले होते, त्यांच्याकडे माझा मोबाईल चुकून गेले, यावर विरोधी पक्षनेते राजकारण करीत आहे, असे सामंत म्हणाले.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पु्ण्यातील मेट्रो उद्धघाटन कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांचा मोबाईल हरवला होता. तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सापडला आहे. अजितदादांकडे आपला मोबाईल चुकून गेला, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले आहे. सामंताच्या मोबाईल (pune metro)हरवला होता, यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडकून टीका केली आहे.

"ज्यांना मोबाईल सांभाळता येत नाही, ते राज्याचा उद्योग काय सांभाळणार," असा टोला अंबादास दानवे यांनी सामंतांना लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. एकीकडे राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील त्यांची नेमप्लेट एका महिलेने फोडली, तर दुसरीकडे उद्योगमंत्र्यांचा मोबाईल चोरी गेला, राज्यात काय सुरु आहे, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. पुण्यातील मेट्रो कार्यक्रमात माझ्या शेजारी अजितदादा बसले होते, त्यांच्याकडे माझा मोबाईल चुकून गेले, यावर विरोधी पक्षनेते राजकारण करीत आहे, असे सामंत म्हणाले.

शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.कार्यक्रमासाठी पुण्यात उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मोबाईल हरवला होता. कार्यक्रम सुरू असताना उद्योगमंत्र्यांचा हरवलेला मोबाईल सापडला तर परत आणून द्या, अशी कार्यक्रमात सांगण्यात आले होते.

Uday Samant
RajendraKumar Gavit: उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा; 'तुतारी' फुंकणार?

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन तसेच स्वारगेट-कात्रज मेट्रोचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत हे पुण्यात उपस्थित होते. त्यांनी उद्घाटनानंतर मेट्रोने देखील प्रवास केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com