Solapur News
Solapur News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर दबावाचा आरोप; महिला नर्सेस उतरल्या मैदानात!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेच्या अधिवेशनात तडकाफडकी निलंबित केले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा सोलापूरचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

"आरोग्य खात्यातील कर्मचारी हे अत्यंत दबावाखाली काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक आहोत अशी धमकी देत आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय," असा गंभीर आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांनी अशाच धमक्या दिल्या तर आम्ही कसं काम करायचं? असा सवालही आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना विचारला. सोलापूरच्या आरोग्य खात्यातील प्रशासकीय कामकाजात राजकीय नेत्यांचा, पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना मनीष काळजी यांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान सुप्रिया जगताप यांनी राजकीय नेत्यांचा कर्मचाऱ्यावर असलेला दबाव कमी व्हावा म्हणून आमची संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे सांगत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे आम्ही तक्रार पाठवली असल्याची माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्र विभागीय सुप्रिया जगताप, उपाध्यक्ष नयनतारा जाधव, सुरेखा सावरे, कार्याध्यक्ष शीतल साळवे, सरोज हंसनाळ, विलास झुरळे, केदार गद्दी यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT