Thackeray Vs Shinde : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापैकी धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडत आहे. दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. ठाकरे गटांकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, विधिज्ञ देवदत्त कामत हे युक्तिवाद करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे, पक्षप्रमुख पदाबाबतच्या निवडणुकीचा आहे. पक्षप्रमुखपदाची २३ तारखेपर्य़ंत निवडणुक घेण्यात यावी. २३ जानेवारीला या पदाची मुदत संपते, यामुळे पक्षप्रमुख पदासाठी मुदतवाढ द्यावी किंवा या पदासाठी निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात यावी, असा मुद्दा आयोगासमोर मांडण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाच्या या मागणीबाबत मात्र अजूनही आयोगाने कोणताही निर्णय दिलेला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अजूनही संपलेला नाहीये. दरम्यान ठाकरे गटाच्या या मागणीवर शिंदे गटाकडून ही आपली बाजू मांडण्यात येणार आहे.
दरम्यान, आयोगासमोर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कामत म्हणाले की, "शिवसेना पक्षाची प्रतिनिधी सभा ही ठाकरेंकडेच आहे, असं त्यांनी अयोगासमोर म्हंटले आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी ही प्रतिनिधी सभेचा मु्द्दा मांडला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.